esakal | Corona : औरंगाबादच्या वाढत्या रुग्णसंख्येने जालन्याच्या चिंतेत भर
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

मागील सात दिवसापासून जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रूग्ण आढळलेला नसल्याने दिलासा मिळला आहे. मात्र, जिल्ह्यात रेड झोन असलेल्या औरंगाबाद मार्गीच कोरोना प्रवेश करून शकतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी औरंगाबाद-जालना सीमेवरील सर्व मार्ग शंभर टक्के बंद करणे अपेक्षित आहे.

Corona : औरंगाबादच्या वाढत्या रुग्णसंख्येने जालन्याच्या चिंतेत भर

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 95 पर्यंत जाऊन ठेपल्याने जालन्याच्या चिंतेच भर पडली आहे. कारण आजही रेड झोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून जालन्यात वाहनांची आवक सुरूच आहे. त्यात अनेक जण मुख्यमार्गाने जिल्ह्यात प्रवेश मिळत नसल्याने छोट्या-छोट्या रस्ताने औरंगाबाद जिल्ह्यातून जालन्यात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आता पोलिस जिल्ह्याच्या सीमेवरील सर्व मार्ग बंद करून बंदोबस्त वाढविणार आहेत.

सध्या जालन्यात कोरोनाच्या दोन रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केलेले नाही. त्यात जालना जिल्ह्याच्या शेजारील औरंगाबाद शहरात मागील दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ही बाब औरंगाबाद प्रमाणेच जालना जिल्ह्याच्या चिंतेत वाढ करणारी ठरत आहे.

औरंगाबाद शतकाच्या उंबरठ्यावर, रुग्णसंख्या ९५वर

पोलिस प्रशासनाचा जालना-औरंगाबाद महामार्गावर चेकपोस्ट असून अत्यावश्यक पास असणाऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. मात्र, आता अत्यावश्यक पास असणाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेश देणे म्हणजे धोक्याची घंटा ठरू शकते. त्यात अनेक जण जालना-औरंगाबाद मुख्य मार्गावर पोलिसांची तपासणी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करीत आहेत. यात वाकुळणी फाटा-बाजार वाहेगाव- रोषणगाव-धोपटेश्वर मार्गे थेट जालना जिल्ह्यात प्रवेश केला जातो. तर शेकटा-गेवराई बाजार मार्गे बदनापूर शहरात दाखल होऊन जालना शहरात येणे शक्य आहे.

पैठण तालुक्यात पोलिसांवर दगडफेक, सामुदायिक प्रार्थनेला केला प्रतिबंध

तसेच वाकुळणी फाटा- वाकुळणी- नानेगाव- डोंगरगावमार्गे देखील अनेक जण जालन्यात दाखल होत आहेत. तर वाकुळणी-नानेगाव मार्गे अंबड तालुक्यात जाण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांना मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या मार्गावरही चेकपोस्ट निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून हे मार्ग देखील बंद करण्यात येणार आहेत. 

दरम्यान जालना जिल्ह्यालगत असलेल्या बीड, परभणी जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्ण नाही. मात्र, औरंगाबाद-बुलडाणा या रेड झोनच्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यांचे अहावाल निगिटेव्ही आले असले तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप या दोन्ही रुग्णांना कोरोना मुक्त जाहीर केले नाही.

महाराष्ट्र दिनाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

तसेच मागील सात दिवसापासून जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रूग्ण आढळलेला नसल्याने दिलासा मिळला आहे. मात्र, जिल्ह्यात रेड झोन असलेल्या औरंगाबाद मार्गीच कोरोना प्रवेश करून शकतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी औरंगाबाद-जालना सीमेवरील सर्व मार्ग शंभर टक्के बंद करणे अपेक्षित आहे.

औरंगाबाद-जालना मुख्य मार्गावर चेकपोस्ट असून तेथून केवळ जालना पोलिसांचा अत्यावश्यक पास असेल, तर औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. परंतु, काही जण मुख्य मार्गाने जिल्ह्यात न येता छोट्या मार्गाने औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यानुसर औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर सर्व छोट्या मार्गांवरही चेकपोस्ट तयार केले जाणार असून अति अत्यावश्यक कामासाठीच आता पोलिस प्रशासनाकडून पास दिले जातील.
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना.