सिल्लोडला कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांसह दलाल ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

सिल्लोड शहरालगतच्या आव्हाना रस्त्यावरील नूर कॉलनी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सिल्लोड शहर पोलिसांनी शनिवारी (ता. 30) दुपारी दोनच्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या दलालासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले, तर एक महिला फरारी झाली.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड शहरालगतच्या आव्हाना रस्त्यावरील नूर कॉलनी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सिल्लोड शहर पोलिसांनी शनिवारी (ता. 30) दुपारी दोनच्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या दलालासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले, तर एक महिला फरारी झाली.

शहरातील नूर कॉलनी येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. कुंटणखान्यावर छापा टाकण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठविले. त्यानंतर या ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये दलाल साहेबखॉं मुन्शीखॉं पठाण,
(वय 48, रा. आव्हाना रोड, सिल्लोड) याच्यासह मीना भालेराव (40, रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर), मंगलाबाई म्हस्के (45, रा. आव्हाना रोड, सिल्लोड) पूजा जाधव (23, रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा ः कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह, बलात्कार की खून ?

सोनी श्रीरंग शेळके ही संशयित महिला फरारी झाली. सर्व संशयित आरोपींच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली अनैतिक व्यापार प्रतिबंधअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शहरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कित्येक वर्षांनंतर केलेल्या कारवाईमुळे एकच चर्चा सुरू झाली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, फौजदार बालाजी ढगारे, कर्मचारी संजय आगे, भिकन सतुके, कृष्णा दुबाले, पंडित फुले, वैशाली सोनवणे, जयश्री महालकर यांनी केली.

हेही वाचा ः ऊसताेडीच्या हंगामास झालीय सुरवात

जुगार खेळणाऱ्यास पकडले
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूस मोकळ्या जागेत मटका जुगार खेळणाऱ्यास पोलिसांनी शनिवारी (ता.30) पकडले. बाबासाहेब दौलत जगधने (वय 50, रा. दत्तनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी रोख एक हजार 30 रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्व वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, विजय खोकड तपास करीत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Raid In Read Light Area Sillod