बीडला मजनूंच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचे दीदी-काका पथक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

बीड जिल्ह्यातील छेडछाडीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांचे दीदी-काका पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकांनी 24 तास मोबाईल सुरू ठेवण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत. 

बीड - छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि हैदराबाद येथील घटनेनंतर अधिकच सतर्क झालेल्या बीड पोलिसांनी रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी अगोदर पोलिस कवच आणि शक्ती महिला सुरक्षा पथक नेमले होते. आता या "काका-दीदी' पथकांची भर पडली आहे. या पथकांनी 24 तास मोबाईल सुरू ठेवण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले. 

सोमवारी (ता. 16) त्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या. महिला शक्ती पथक, पोलिस काका-दीदी, विशेष पोलिस पथक यांनी आपले दूरध्वनी क्रमांक कायम सुरू ठेवावेत. त्यावर माहिती किंवा काही तक्रार आल्यानंतर जलद गतीने कार्यवाही करावी. शाळा-महाविद्यालय व खासगी क्‍लासेसच्या आवारांमध्ये वेळोवेळी भेटी द्याव्यात, तसेच विद्यार्थिनींची व मुलींची छेड काढणाऱ्यांना ताब्यात घ्यावे, अशा सूचना आहेत.

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

पहिल्यांदाच कारवाई झाली असेल तर त्याच्या नातेवाइकांना बोलावून त्यांच्यासमोर मुलाला समज द्यावी, तसेच नातेवाइकांनादेखील समज द्यावी. पुन्हा त्याला पकडले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शहरातील विविध ठिकाणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून गस्त घालावी, अशा सूचना केल्या आहेत.

हे उघडून तर पहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’

महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह विविध ठाण्यांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. 
 

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे ! 

प्रत्येक आठवड्यात अहवाल पाठवण्याचे आदेश 
महिला शक्ती पथक व पोलिस कवचअंतर्गत कारवाई करण्यात आलेला अहवाल प्रत्येक ठाण्याने आठवड्यातील एक दिवस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक राणी सानप यांच्याकडे पाठवण्याचे आदेश दिले असून, त्या सदरील अहवाल पोलिस अधीक्षक यांना दिल्यावर ते पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police squad for the settlement of Majnu