लातुर-गुलबर्गा रेल्वे मार्गावरुन औशात राजकारण!

abhimany-nilengekar-.jpg
abhimany-nilengekar-.jpg

औसा (लातूर) : लातूरहून गुलबर्ग्याला जाणारी रेल्वे कुठुन जावी यासाठी भाजपात व राष्ट्रवादीत सध्या जोरदार टिका टिपणी होत आहे. माजी मंत्री तत्कालीन आमदार बसवराज पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लीकार्जुन खरगे यांच्याकडे लातुर-गुलबर्गा हा संभाव्य रेल्वे मार्ग औशाहुन लामजना-किल्लारी-उमरगा हा कमी अंतर व सरळमार्गी असल्याने याचा सर्वे करुन हा रेल्वेमार्ग औशाहून जावा अशी विनंती केली होती. या मागणीला आनेक वर्षे उलटली पण सर्वे झाला नाही. आता याच रेल्वेमार्गासाठी औसा ऐवजी निलंग्याहून जाणारा सर्वे होत असल्याने औशातील राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असुन या बाबत नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना हा रेल्वेमार्ग औशाहुनच जावा अशी मागणी केली आहे. 


औशात भाजपाचे आमदार अभिमन्यु पवार असतांना व रेल्वेमार्गाबाबत औशाची मागणी असतांना निलंगेकरांनी हा मार्ग निलंग्याहून वळविल्याने चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. औसा तालुका हायवे व रेल्वे निर्मीती संघर्ष समीतीच्या माध्यमातून डॉ. अफसर शेख यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवुन औसा शहर प्राचीन शहर असुन शहरात असनारा भुईकोट किल्ला आहे. शहराला जुना इतिहास असल्याने शहर व तालुक्याला निजाम व इंग्रज राजवटीत महत्व होते. त्यांचे व्यापारी व प्रशासकीय कामकाजाचे औसा हे केंद्र होते. मात्र सोमवार (ता.23) नोव्हेंबर पासून लातुर रोड ते निलंगा मार्गे रेल्वेमार्गाचा सर्वे सुरु असल्याचे कळते. हा मार्ग औशातुन न जाता ईतर ठिकाणाहून जात आहे. औशाहून जाणारा हा रेल्वेमार्ग सरळ व कमी खर्चीक असून शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. 

या बाबत सहानुभुतीपुर्वक विचार करुन औसा शहराला न्याय द्यावा अशी मागणी करीत त्यांनी विशेष बाब म्हणुन यापुर्वी औसा येथे टेंबी येथे प्रस्तावित असनारा बोगी प्रकल्पही ईतरत्र हलविल्याची जाणीव रेल्वेमंत्र्यांना करुन दिली आहे. या रेल्वे मार्गासाठी औशात आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसुन येत आहे.


आमदारांनी गल्लीपेक्षा दिल्लीत आपले वजन दाखवावे

याबाबत नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी औशाचे आमदार अभिमन्यू पवारांवर टिकास्त्र सोडतांना सांगीतले की आमदारांनी गल्लीतील राजकारण सोडून शहराच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी आपले वजन दिल्लीत वापरावे जेणे करुन इतर ठिकाणाहून जाणारी रेल्वे ही औशाहून जाईल.

रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा करणार : आमदार अभिमन्यू पवार

लातूरचा रेल्वेबोगी प्रकल्प मुळात औसा तालुक्यातील टेंबी येथेच होणार होता. या बाबत तशा बातम्या सर्व स्तरातुन छापुन येऊन मला अभिनंदनांचे फोन आले. प्रत्यक्षात रेल्वे कमीटीच्या सदस्यांनी सर्वे करतांना या भागात रेल्वेमार्ग नसल्याने हा प्रकल्प दुसरीकडे वळविण्याचा हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री यांनी माझ्या विनंतीवरुन हा प्रकल्प लातुर येथेच ठेवला. औशाहून गुलबर्गा हा मार्ग सरळ व कमी अंतराचा असल्याने हा रेल्वेमार्ग औशातुनच जावा यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विनंतीवरुन माकणी पाणीपुरवठा योजना मंजुर करुन दिली. व ती आज पुर्णत्वास जात आहे. हे औसेकरांना माहीत आहे. यामुळे जे जे औशाला लागेल ते आणण्याचा आपला प्रयत्न सुरु आसल्याचे त्यांनी सांगीतले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com