esakal | कोरोनामुक्तीनंतर पोस्ट कोविड क्लिनिक गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

post covid clini.jpg

डॉ. रमेश भराटे यांची माहिती, घ्यावी खबरदारी 

कोरोनामुक्तीनंतर पोस्ट कोविड क्लिनिक गरजेचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : काही दिवसांपासून कोरोनावर मात करून रुग्ण बरे होत आहेत. पण, आजारातून बाहेर पडल्यानंतरही काही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनामुक्तीनंतर पोस्ट कोविड क्लिनिक आवश्यक आहे, असे मत श्वसनविकार व छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सध्या कोरोनातून बरेच रुग्ण दुरुस्त झालेले आहेत. कोरोना दुरुस्तीचा वेग हा जवळ जवळ ८५ टक्के आहे. परंतु, या आजारातून दुरुस्त झालेल्या रुग्णांनी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यांनी सात गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणे गरजेचे आहे. आहार संतुलित व प्रथिनयुक्त घ्यावा. पाणी कोमट करूनच प्यावे, हलके व्यायाम व योगासन करून श्वसनाचे व्यायाम करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या बरोबरच पोस्ट कोविड इफेक्ट म्हणून शरीरात काही बदल झालेले पण दिसून आलेले आहेत. काही रुग्ण मानसिकरीत्या खचून जाणे(डिप्रेशन) किडनी विकार, हृदयरोग, श्वसन विकार, स्मृतीभ्रंश झालेलेपण दिसून आलेले आहेत. कोरोना विषाणूंमुळे शरीरातील प्रत्येक अवयव बाधित झालेले दिसून आलेले आहे. आपण आजारातून मुक्त झालो म्हणजे पूर्णतः बरे झालो असे नाही. हा आजार परत पण होवू शकतो त्यामुळे मास्क, सोशल डिस्टिन्सिंग, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर हाच सध्या तरी एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शरीराचे हृदयाचे ठोके, ऑक्सिजन, तापमान आदी नियमित पाहणे अत्यंत आवश्यक आहे. जर लक्षणे जास्त जाणवली तर आपल्या नजीकच्या व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आनंदी जीवन जगू शकता. दिल्ली सारख्या महानगरामध्ये कोविडमधून दुरुस्त झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहेत कदाचित आपल्याकडेही लवकरच सुरू करण्यात येतील, असेही डॉ. भराटे यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)