जमियत उलेमातर्फे उदगीरात मूक मोर्चा : राष्ट्रपतींना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

या मुकमोर्चाच्या समोर तिरंगा ध्वज घेऊन हजारो मुस्लिम बांधवांनी हाताला काळी पट्टी बांधून आणि हातात निषेधाचे फलक घेत सीएबी विधेयक आणि सरकारचा निषेध व्यक्त केला.

उदगीर : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतल्याच्या निषेधार्थ उदगीरात शुक्रवारी (ता. 13) दुपारी जमीयत उलेमा ए हिंदच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. या कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

संपूर्ण देशभरात जमीयत उलेमा ए हिंदच्या वतीने शुक्रवारी (ता. 13) आंदोलन पुकारण्यात आले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मुकमोर्चाला प्रारंभ झाला. या मुकमोर्चाच्या समोर तिरंगा ध्वज घेऊन हजारो मुस्लिम बांधवांनी हाताला काळी पट्टी बांधून आणि हातात निषेधाचे फलक घेत सीएबी विधेयक आणि सरकारचा निषेध व्यक्त केला.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

जय जवान चौक, शहर पोलीस ठाणे, नगरपरिषद , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयासमोर रंगा राचुरे, शिवानंद हैबतपुरे, जमीयत उलेमा ए हिंदचे मराठवाडा अध्यक्ष मौलाना हबिबूर रहमान यांनी यावेळी विधेयकाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निषेधार्थ भाषणे केली. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी

या मूक मोर्चामध्ये मौलाना शमशुल हक, मौलाना अजिमोद्दिन, मौलाना अजिर्जुर रहिमान, मौलाना ताहेर, मौलाना हाफेज जाकीर, मौलाना मुफ्ती जावेद, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, व्यंकटराव पाटील, राजकुमार अतनुरे, दिलीप कांबळे, नगरसेवक मंजूर पठाण, महबूब शेख, एमआयएमचे नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest March Against CAB in Udgir Latur