बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या...
Beed ACB News
Beed ACB Newssakal

अंबाजोगाई (जि.बीड) : केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास बुधवारी (ता.२२) बीडच्या (Beed) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच पथकाने ही कारवाई केली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी कार्यकारी अभियंता कोकणे यांनी ३० हजार रुपयांची लाच भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितले. (Public Works Department Executive Engineer Trapped In ACB Trap)

Beed ACB News
पैसे देतील त्यांच्याकडे ते पळतील, जलीलांची औरंगाबादच्या शिवसेना आमदारांवर टीका

केदार यांनी दूरध्वनीवरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. या तक्रारीची बीडच्या लाचलुचपत पथकाने खात्री करून सापळा रचला व ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास रंगेहाथ पकडले.

Beed ACB News
सैनिकांनी चौकीदार व्हावे ही पंतप्रधान मोदींची इच्छा : असदुद्दीन ओवैसी

पिस्तुलाने चर्चेतील अधिकारी

कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी रूजू होताच काही दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे पिस्तुल मिळण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा वापरणे असे प्रकारही येथे होत असल्याचे कंत्राटदार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com