esakal | अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करा : वडेट्टीवार
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करा : वडेट्टीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पूर्णा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परभणी (Parbhani) लोकसभा मतदार संघातील शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे (State) मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

परभणीचे खासदार संजय जाधव,परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे, डॉ. राम शिंदे, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिपक बाराहाते यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की, ता. ६ व ७ सप्टेंबर रोजी परभणी लोकसभा मतदारसंघात अतिवृष्टी झाली. सर्वदूर पाऊस झाल्यामुळे नदी, नाले व ओढ्यांना पूर आले.

शिवाय अनेक धरणातील पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच अतिवृष्टीमुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांच्या पडझडीही झाल्या असून अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. यामध्ये शेतकरी व सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा: डम्पिंग ग्राऊंडची समस्या सुटली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे व पडझडीचे ताबडतोब पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून त्वरीत अनुदान द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी या निवेदनाची दखल घेऊन परभणी व जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीतील पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.अशी माहिती सकाळ शी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिली .

loading image
go to top