esakal | जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी शिडकावा 
sakal

बोलून बातमी शोधा

वडीगोद्री परिसरात पावसाचे साचलेले पाणी 

शेतात गहू, हरभऱ्याची पिके उभी आहेत, काढायला मजूर नाहीत, हार्वेस्टर बंद आहेत तर कोरोनाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी शिडकावा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी (ता.२५) ढग दाटून आले. काही भागात पावसाचा शिडकावाही झाला. वडीगोद्री परिसरात पावसाने तासभर हजेरी लावली. 
सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे ग्रामीण भागात धास्ती वाढलेली आहे. त्यातच आता जिल्ह्यात ठिकठिकाणी ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे 

जिल्ह्यात घनसावंगीत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील जांबसमर्थ परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा झाला. तीर्थपुरीत दुपारी परिसरात पावसाला सुरवात झाली. विजेचा कडकडाटही सुरू होता. 

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

अंबड तालुक्यातील शहागड परिसरात हलक्या फुलक्या पावसाच्या सरी पडल्या. अंकुशनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वडीगोद्री येथे दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेचा कडकडाटासह पडलेल्या पावसाने शेतातील गहू, मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले. अंतरवाली सराटी, नालेवाडी आदी ठिकाणी एक तास पाऊस झाल्याने पाणी साचले आहे. जोरदार पाऊस झाल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

हेही वाचा : ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी) परिसरात कडक उन्हं होते; मात्र बुधवारी दुपारी तीननंतर आकाशात ढग दाटून आले. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर चार वाजता पावसाला सुरवात झाली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. शेतात गहू, हरभऱ्याची पिके उभी आहेत, काढायला मजूर नाहीत, हार्वेस्टर बंद आहेत तर कोरोनाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

loading image