जालना शहरात पावसाची हजेरी 

उमेश वाघमारे 
Thursday, 16 July 2020

जालना शहरात बुधवारी सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू होती. अधूनमधून पावसाचा जोर कमी-अधिक होत होता. दरम्यान, बुधवारी सकाळी मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ७.१७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

जालना - शहरात बुधवारी (ता.१५) सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू होती. अधूनमधून पावसाचा जोर कमी-अधिक होत होता. दरम्यान, बुधवारी सकाळी मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ७.१७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

जालना शहरात मंगळवारी (ता.१४) पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी (ता.१५) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र, पावसाचे जोर वाढला नाही. दुपारनंतर पावसाची ही रिमझिम थांबली.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

दरम्यान, बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ७.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्यात १३.२५ तर आतापर्यंत ३२८.२७ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ५.८० तर आतापर्यंत ४५२ मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात १३.८८ तर आतापर्यंत ३४८.७१ मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यात ६.८० तर आतापर्यंत २९७.२० मिलिमीटर, परतूर तालुक्यात २ तर आतापर्यंत २७२ मिलिमीटर, मंठा तालुक्यात ४.७५ तर आतापर्यंत २९७.२५ मिलिमीटर, अंबड तालुक्यात १०.२९ तर आतापर्यंत ४६६.१४ मिलिमीटर, घनसावंगी तालुक्यात ०.५७ तर आतापर्यंत ३४१.५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

जिल्ह्यात ता. एक जूनपासून आतापर्यंत एकूण ३५०.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

वालसावंगीत पावसाची हजेरी 

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील  वालसावंगी परिसरात बुधवारी (ता. १५) पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना फायदा होणार आहे. 
परिसरात पहाटे ५ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत रिमझिम पावसाच्या सरी सुरू होत्या. सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने सर्वच शेतीकामांना ब्रेक लागला होता. शेतकऱ्यांसह मजूर घरीच होते. दरम्यान, पडलेल्या भिजपावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. दिवसभर ढगाळ वातावरण मात्र कायम होते. भिजपावसामुळे शेतकरीवर्ग आनंदी दिसून आला. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district