esakal | जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

jalna paus.jpg

सर्वाधिक बदनापूर तालुक्यात तब्बल ७६.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अंबड तालुक्यात ७०.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी या दोन तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड आणि बदनापुर या दोन तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात तब्बल २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान बुधवारी (ता.२४) रात्री जिल्ह्यात पावसाची सर्वदूर रिमझिम झाली. जालना जिल्ह्यात गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

यात सर्वाधिक बदनापूर तालुक्यात तब्बल ७६.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अंबड तालुक्यात ७०.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी या दोन तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. बदनापूर तालुक्यातील मंडळात तब्बल २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
तर बदनापूर तालुक्यातील शेलगाव मंडळ ६७ मिलिमीटर पावसाचे नोंद झाली आहे. अंबड तालुक्यातील जामखेड मंडळात, १२९ मिलिमीटर रोहिलागड, मंडळात ११५ मिलिमीटर धनगरपिंप्री मंडळात ८८ मिलिमीटर तर सुखापुरी मंडळ ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

तर जालना तालुक्यात १७.३८ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ७६.२० मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात ६.२५ मिलीमीटर, जाफराबाद तालुक्यातील ६ मिलिमीटर, परतूर तालुक्यातील ९.२५ मिलिमीटर, अंबड तालुक्यात ७०.५७ मिलीमीटर, घनसावंगी तालुक्यात ०.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

परतुर तालुका कोरडा
जिल्ह्यात बुधवारी (ता.२४)रात्री पावसाळ्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी परतूर तालुक्यात मात्र पाऊस झाला नाही. त्यामुळे परतुर तालुका कोरडा राहिला आहे.

loading image