रजनी पाटील म्हणाल्या मी केजकरांची सुन

अशोक पाटील म्हणाले ‘टायगर अभी जिंदा है’
रजनी पाटील
रजनी पाटीलsakal

केज : मी केजकरांची सून (daughter in law)असून माझं घर(Home) आणि कुटूंब केज आहे. घर सांभाळण्याची व घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. केजकरांनी घाबरण्याचे कारण नाही, केजकरांना कुठल्याच गोष्टीसाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची गरज पडू देणार नाही, असा विश्वास खासदार व हिमाचल आणि जम्मू काश्मिरच्या काँग्रेस प्रभारी रजनी पाटील यांनी उपस्थितांना दिला.केज नगर पंचायत निवडणुकीत(Election) काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत सोमवारी त्यांनी केजकरांना भावनिक हाक दिली.

रजनी पाटील
दहावी-बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारपासून संकेतस्थळावर

केजच्या व्यापारी संकुलाचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावू. केजमध्ये आमचे आजत सासरे, सासरे व पती अशोक पाटील यांनीच अत्यावश्यक असलेल्या पाणी योजना, वीज, रस्ते, ग्रामीण रुग्णालय उभारणी अशी कामे केल्याचा दावाही श्रीमती पाटील यांनी केला. येणाऱ्या काळात देखील आम्हीच केजचा विकास करू. बाहेरचा माणूस येऊन केजचा विकास करू शकत नाही. विकास करण्याची तळमळ ही त्या गावाशी नाळ जोडलेली असेल तर होते. ही नाळ आमच्या पाटील कुटुंबाची जोडलेली आहे. शहरात आता वाढीव पाईपलाईन चा प्रस्ताव मंजूर आहे. परंतु मधल्या काळात कोरोनामुळे ही कामे प्रलंबीत होती ती आता सुरू होतील.

रजनी पाटील
प्रभाग रचनेतील बदलांसाठी मुंबईत पुन्हा होणार बैठक

शहरात आगामी काळात शहरात बाल उद्यान, प्रत्येक वॉर्डात शुद्ध पाण्याचे प्लँट, भव्य क्रीडा संकुल, नाट्यगृह याची उभारणी होईल. यासाठी योग्य जागांची चाचपणी सुरू आहे. महिलांसाठी लघु व गृह उद्योग आपण तातडीने सुरू करणार आहोत. निराधारांना योजना मंजूरीचे काम आमच्या कार्यकर्त्यांनी केले. यापुढेही केले जाईल. आम्ही निःपक्षपातीपणे काम करतो, केजचे काम करणं म्हणजे आम्ही काही उपकार करत नसूनन ते आमचे कर्तव्य आहे. माजी मंत्री अशोक पाटील यांनीही ‘टायगर अभी जिंदा है’ म्हणत विरोधकांवर तोफा डागल्या. अशोक पाटील दिसत अशोक पाटील कुठे दिसतच नाहीत, येतच नाहीत, या आरोपावर त्यावर वाघ कुठेही दिसत नसतो तो कधीतरी दिसतो असे म्हणत टोला लगावला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, सुरेश पाटील, राहुल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com