जुना 130, नवा कांदा शंभरीकडे

प्रकाश बनकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • क्‍विंटलमागे 12 ते 13 हजारांचा दर 
  • बाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव येतो कांदा
  • किरकोळ बाजारात खराब गुणवत्तेचा कांदा 40 ते 60  रुपये

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे हाती आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच प्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. यामुळे बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक घटली आहे. परिणामी कांद्याची दरवाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून वाढलेले काद्यांचे दर कमी होण्यास तयार नाही. जाधववाडी बाजार समितीत घाऊक बाजारात जुना कांदा (उन्हाळी कांदा) सर्वोच्च 130 रुपये किलो तर नवीन कांदा 90 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणले आहे. हे दर आणखी महिनाभर कायम राहतील असा अंदाज व्यापारी असलम बागवान यांनी वर्तविला. 

सप्टेबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे दर चांगलेच वधारले होते. त्यानंतर पुन्हा ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमाल वाया गेला. कांद्याचे उत्पादन घटल्याने परिणामी बाजारात कांद्याची आवक घटली. जाधववाडी बाजार समितीत कांदाची आवक दिवसेंदिवस अत्यंत कमी होत चालली आहे. त्यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात उन्हाळी कांदा प्रतिक्विंटल 12 हजार ते 13 हजार रुपये तर नवीन कांद्याला 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. 

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

किरकोळ बाजारात उन्हाळी कांदा 150 रुपये

किरकोळ बाजारात उन्हाळी कांदा 150 रुपयांपर्यंत तर नवीन कांदा 90 रुपये किलोने विकला जाताना दिसून येतो. दुसरीकडे बाजारात कांद्याची मागणी आणि अत्यल्प पुरवठ्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. मागील पंधरवाड्यापासून समितीत कांद्याची आवक अत्यल्प होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वधारले आहेत.बाजारात नवीन कांदा येत असून त्याची गुणवता फारशी चांगली नसल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले. 

यापुढेही बिबटे येतच राहणार, सवय करून घ्या

नेमका कुठून आला सिडकोत बिबट्या

या ठिकाणावरून येतो कांदा 
कृषी उत्पन्न बाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव या ठिकाणावरून कांद्याची आवक होते. यंदा परतीच्या पावसामूळे कन्नड, वैजापूर आणि लासूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामूळे आवक घटली आहे. गेल्या वर्षी कांद्याची मोठे उत्पन्न झाले होते. मात्र दर नव्हता. यामूळे राज्य शासनाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनुदान जाहिर करावे लागले होते. 

स्कूल बसचा रंग पिवळाच का, वाचा सविस्तर

एका तपानंतर तो पोलिसांच्या गळाला

आवक घटली
कृषी उत्पन्न बाजार समितीत,वैजापूर,लासूर, कन्नड, नाशिक, लासलगाव या ठिकाणावरून कांद्याची आवक होते. यंदा परतीच्या पावसामूळे कन्नड, वैजापूर आणि लासूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामूळे आवक घटली आहे. गेल्या वर्षी कांद्याची मोठे उत्पन्न झाले होते. मात्र दर नव्हता. यामूळे राज्य शासनाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनुदान जाहिर करावे लागले होते. 

""समितीच्या भाजी मार्केटमध्ये ठोकमध्ये उन्हाळी कांद्याला 120 ते 130 रुपये तर नवीन कांद्याला 80 ते 90 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात खराब गुणवत्तेचा कांदा 40 ते 60 रुपय किलोने विकला जात आहे. बाजार समितीत कांद्याची आवक अत्यल्प होत असून आलेला मालाची गुणवत्ता चांगली नाही. बाहेर राज्यातून कांद्याची आवक झाली तर भाव कमी होवू शकतील. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती राहील असे वाटते.'' 
असलम बागवान, कांदा व्यापारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rate of old planted Onion 120 & New planted Onion rate 100 in Aurangabad