बाळासाहेब आज असते तर; असे घडले नसते- रावसाहेब दानवे

raosaheb danve
raosaheb danve

औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही युतीला स्पष्ट कौल दिला; मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खरे तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे यांना फोन केला; मात्र त्यांनी घेतला नाही. आम्हाला मुख्यमंत्रीपद देणार असेल तर बोला असे सांगत ते मुख्यमंत्री पदावर अडून होते. आज बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. 17) पत्रकार परिषदेत केला. 

श्री. दानवे म्हणाले, वर्ष 1995 मध्ये आजच्या सारखेच सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र बाळसाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी असे ठरविले होते. त्या आधारे शिवसेनेचे मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते आणि भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद झाले होते. जे सूत्र बाळासाहेबांनी आणि महाजनांनी घालून दिले होते. त्याच सूत्रांनी भाजप-शिवसेनेने जावे आणि जनमतचा आदर करावा. बाळासाहेब असते तर असे घडलेच नसते'', असे सांगत त्यांनी शिवसेनला टोला लागावला. 

नुकसानीचे युद्धपातीळवर पंचनामे 

परतीच्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यपालांनी हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली. यासह राज्यपालांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा पद्धतीने युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहेत. दुष्काळाचे निकष लावून दोन हेक्‍टरी मदत देण्यात येईल, अशी माहिती श्री. दानवे यांनी दिली. 

राज्यातील नेतृत्वात बदल नाही 

"मी पुन्हा येईन' या वाक्‍यावरून शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विरोध केला का, असा प्रश्‍न विचारल्यानंतर दानवे म्हणाले, ""राज्यात पाच वर्षांत जी विकास कामे झाली. जे संकटे आली ते यशस्वीरीत्या हातळाण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामुळे नेतृत्व बदलाचा विषयच येत नाही, असे स्पष्ट मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. दरम्यान, रस्त्यांची कामे थांबली आहेत. या विषयी विचारले असता ते म्हणाले, ""काळजी करू नका सरकार आमचे येणार आहे. निधी उपलब्ध करून देऊ'', असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

सत्तार यांनी पाच वर्षे टक्कलच ठेवावे 

रावसाहेब दानवे पराभूत होईपर्यंत डोक्‍यावर केस उगू न देण्याचा संकल्प सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. आता त्यांना पाच वर्षे टक्‍कलच ठेवावी लागणार आहे. कारण मी पुन्हा निवडून आलो आहे, असे सांगत दानवे यांनी सत्तारांना टोला लगावला.

हे ही वाचा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com