esakal | शेतकऱ्यांना दिलासा: कापूस खरेदी सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

kapus kharedi

कापूस खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, जवळा बाजार, वसमत येथे कापूस खरेदी केला जाणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा: कापूस खरेदी सुरू होणार

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून (ता. २०) कापूस खरेदी सुरू होत आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, जवळा बाजार, वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या नियंत्रणाखाली जिल्‍ह्यात ठिकठिकाणी कापूस खरेदी केली जाणार असून त्‍याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले आहे.

हिंगोली येथील खुराणा जिनिंग, (महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ), औंढा तालुक्‍यातील जवळा बाजार येथील लाहोटी जिनिंग (सीसीआय), हयातनगर (ता. वसमत) येथील पूर्णा ग्लोबल जिनिंगमध्ये (सीसीआय) नोंदणी करून खरेदी करण्यात येणार आहे.

हेही वाचाहिंगोलीचे भूमीपुत्र देताहेत मोफत आरोग्य सेवा

शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 तरी कापूस विक्री करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्‍यान, विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकविला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये विक्रीअभावी पडून आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना 

तो खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार असल्याचेही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस उद्योगावर अवलंबून आहे. 

सूचनांचे पालन करावे

कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे. शेतीपूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाउन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावा. 

ऑनलाइन व फोनद्वारे नोंदणी करता येणार

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा, कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तिक नियोजन करावे, जे शेतकरी ऑनलाइन व फोनद्वारे नोंदणी (बुकिंग) करतात त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा, हे त्यांना कळविले जाणार आहे.

येथे क्लिक कराव्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर

मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या सूचना

कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापसासह घरामध्ये सुरक्षितता म्हणून साठवून ठेवलेला कापूसही खरेदी केला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असल्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. किमान कापूस विक्रीतून चार पैसे हाती येतील व कोलमडलेल आर्थिक गणित सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 

loading image