अखेर रेणापूर-लातूर महामार्ग झाला खुला, विद्युत मनोऱ्याची उंची वाढविली

हरी तुगावकर 
Wednesday, 11 November 2020

धीरज देशमुख यांचा पाठपुरावा; विद्युत मनोऱ्याची उंची वाढल्याने वाहतूक सुरळीत 

लातूर : रेणापूर-पिंपळफाटा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील उच्च दाब विद्युत मनोऱ्याची उंची वाढवण्यासाठी आमदार धीरज देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मनोऱ्याची उंची अखेर वाढवण्यात आली असून मुख्य रस्ता बुधवार (ता. ११) पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी रस्त्यावरील रेणापूर येथील रेणापूर फाट्याजवळ उच्च दाब विद्युत मनोऱ्याची उंची न वाढल्यामुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. बरेच अपघातही या ठिकाणी झाले. विद्युतवाहिन्या उंचावर नसल्याने वाहने या रस्त्यावरून मार्गस्थ होत नव्हती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या घटनांची तातडीने दखल घेऊन आमदार धीरज देशमुख मनोऱ्याच्या उंची वाढवण्यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्युत मनोऱ्याची उंची अखेर वाढवण्यात आली. मनोऱ्याची उंची वाढल्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी अखेर खुला झाला आहे. याआधी पर्यायी रस्त्यांचा वापर केला जात होता. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renapur Latur highway Finally open