esakal | तळीरामांचा रोजच गोंधळ, देशीदारुचे दुकान हटविण्यासाठी शेकडो नागरिक धडकले नगरपालिकेवर

बोलून बातमी शोधा

Bhokardan Municipal Council News}

सर्वांनी कोरोनाची खबरदारी घेत तोंडाला मास्क लावले होते. सदरील दुकान हटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पालिकेच्या विशेष सभेतही दुकान हटविण्याबाबत ठराव घेण्यात आला असून, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दुकान हटविण्याची नोटीस देऊनही अद्याप दुकान हटविण्यात आले नाही.

तळीरामांचा रोजच गोंधळ, देशीदारुचे दुकान हटविण्यासाठी शेकडो नागरिक धडकले नगरपालिकेवर
sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी व मुस्लिम समाजाच्या मशिदीजवळ असलेले देशीदारूचे दुकान हटविण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (ता.पाच) भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पालिकेवर धडकले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील नवीन भोकरदन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेकडो नागरिकांसह मुख्य रस्त्यावरून पायी येत पालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा -  ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी

यावेळी सर्वांनी कोरोनाची खबरदारी घेत तोंडाला मास्क लावले होते. सदरील दुकान हटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पालिकेच्या विशेष सभेतही दुकान हटविण्याबाबत ठराव घेण्यात आला असून, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दुकान हटविण्याची नोटीस देऊनही अद्याप दुकान हटविण्यात आले नाही. तर काही बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगत संतप्त नागरिक शुक्रवारी पालिकेवर धडकले. या दुकानामुळे  परिसरातील रहिवाशी त्रस्त असून, तळीरामांच्या रोजच्या गोंधळाला जाम वैतागले आहे.

हेही वाचा -  बैलांचा पाय घसरुन बैलगाडी, शेतकरी पडले कालव्यात; ग्रामस्थ होते म्हणून वाचले जीव

याशिवाय या परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, जवळच मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ आहे. त्यामुळे सदरील दुकान येथून हटविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याठिकाणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत पालिकेचे नगर अभियंता किशोर ढेपले यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भदंत एस प्रज्ञाबोधी महाथेरो,भदंत नागसेन,भदंत सामीपुत्र यांच्यासह भारतीय बौद्ध महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, नगरसेवक दीपक बोर्डे, यादवराव पगारे, भीमराव भिसे, डॉ. पिसे पाटील, सिद्धार्थ वेलदोडे, बाबासाहेब पगारे, विशाल मिसाळ, शेख रईस, सय्यद आरिफ, गंगाधर कांबळे, शामराव दांडगे, शेख ताजुद्दीन, निर्मल पानसरिया, संजय परदेशी, शेख अजीम, संजय पिसे, सुभाष साळवे, हर्षवर्धन प्रधान यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.


संपादन - गणेश पिटेकर