जालना जिल्हयाचा बारावीचा निकाल ९१ टक्के 

सुहास सदाव्रते
Thursday, 16 July 2020

बारावी परीक्षेचा गुरुवारी ( ता. १६ ) दुपारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हयाचा सरासरी निकाल ९१ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यंदाही विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारली आहे.

जालना - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा गुरुवारी ( ता. १६ ) दुपारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हयाचा सरासरी निकाल ९१ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यंदाही विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारली आहे.

जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयाचा कला,विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचे ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान  शाखेचे १२ हजार  ७७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, हे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. कला शाखेतील ११ हजार ४४९ विद्यार्थी पास झाले असून ८४.५९ टक्केवारी आहे.वाणिज्य शाखेतील २ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९१ टक्केवारी आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम ( एमसीव्हीसी) ३५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या शाखेची टक्केवारी ९०.७२ इतकी आहे.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

बारावी निकालात भोकरदन तालुक्याचा सर्वाधिक निकाल हा ९५.८९ टक्के इतका आहे.जिल्हयात सर्वात कमी निकाल हा परतूर तालुक्याचा लागला आहे. निकालाची टक्केवारी ही ८३.६६ इतकी आहे.जिल्हयातील विविध शाखा व महाविद्यालयातील १० हजार १८३ विद्यार्थिनी तसेच १६ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. मुलांची टक्केवारी ८८.९० तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.८४ इतके आहे. चाळीस टक्यापेक्षा कमी निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या ही पाच आहे. 

  • तालुका :  टक्केवारी
  • जालना :  ८८.२६ 
  • बदनापूर  : ८९.७७
  • अंबड  : ९०.४४
  • परतूर  : ८३.६६
  • घनसावंगी : ८५.२१
  • मंठा  : ८३.८८
  • भोकरदन  : ९५.८९ 
  • जाफराबाद  : ९३.२८ 
  • एकूण निकाल ९०.७१  

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Result of Hsc

Tags
टॉपिकस
Topic Tags: