esakal | अंबड तालुका शिवसेना उपप्रमुखांच्या घरावर दरोडा, वीस लाखांच्या मुद्देमालाची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery In Wadigodri

वडीगोद्री (ता.अंबड) येथे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुका शिवसेना उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर चोरांनी दरोडा टाकून जवळपास वीस ते एकवीस लाख रूपयांचा मुद्देमाल चोरला आहे.

अंबड तालुका शिवसेना उपप्रमुखांच्या घरावर दरोडा, वीस लाखांच्या मुद्देमालाची चोरी

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री (जि.जालना) :  वडीगोद्री (ता.अंबड) येथे औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालुका शिवसेना उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर चोरांनी दरोडा टाकून जवळपास वीस ते एकवीस लाख रूपयांचा मुद्देमाल चोरला आहे. येथे औरंगाबाद रस्त्यावर खटके यांचे निवासस्थान आहे. गुरुवार (ता.१९) पहाटे चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गेट तोडुन घरात प्रवेश केला. एकाने खटके यांच्या आजीच्या गळ्याला चाकु लावला व दोघांनी कपाटात ठेवलेले नगदी एक लाख चाळीस हजार  व दागिने असे मिळून एकूण वीस ते एकवीस लाखांचा मुद्देमाल काढुन घेतला.

आमदार प्रशांत बंबसह १६ जणांवर गुन्हा दाखल, बनावट दस्तावेज केल्याचा ठपका

शस्त्र हातात घेऊन प्रवेश केलेल्या चोरट्यांनी घरातील इतर सदस्यांना दमदाटी करून सर्व माल लंपास केला. या घटनेने भागात एकच खळबळ उडाली आहे. गोदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, शहागड पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहेत. बिबट्याची दहशत व चोरीच्या घटना यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image