esakal | पाकिस्तानच्या विरोधात बोलले म्हणजे खरा राष्ट्रवाद नव्हे : रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar News

शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत. असा राष्ट्रद्रोही विचार कामाचा नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. 

पाकिस्तानच्या विरोधात बोलले म्हणजे खरा राष्ट्रवाद नव्हे : रोहित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : भाई उद्धवराव पाटील यांनी संपूर्ण जीवनामध्ये याचा अंगीकार केला. युवकांनी राजकारणात काम करताना समाजाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.  भाई उद्धवराव पाटील विचार मंचतर्फे भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुवारी (ता.२१) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. `बदलत्या राजकारणात युवकांसमोरील संधी आणि आव्हाने` या विषयावर ते बोलत होते.

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मंचाचे आदित्य पाटील, सक्षणा सलगर, प्रतापसिंह पाटील, सुरेश बिराजदार आदी यावेळी उपस्थित होते.  यावेळी आमदार पवार म्हणाले की, तत्व सोडून आज एका तर उद्या दुसऱ्या पक्षात, हे फार काळ टिकणारे नाही. हल्लीच्या राजकारणात तत्त्वाला मुरड घातली जाते. ज्या तत्त्वाने आपण काम करतो. मोठ्या संस्था उभा करतो.

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

ज्यांच्यासाठी करतो, त्यांना विश्वासात न घेता अगदी सहज दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात जातात. भाई उद्धवराव पाटील यांनी जनतेशी कधीही गैरविश्वास दाखविला नाही. वेळप्रसंगी अनेक पदांचा त्याग केला. परंतु, सामान्य जनतेचा विश्वासाला तडा जावू दिला नाही. आता जनता हुशार झाली आहे. जेव्हा पक्ष बदल केला जातो. तेव्हा सामान्य नागरिक याचा विचार करतो असे त्यांनी सांगीतले. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा


परखड बोला, विचार मांडा 
एखादा विचार स्वतः पटला नाही, तर तो बोलून दाखविण्याची हिंमत बाळगली पाहिजे. कुणाचे मन दुखावेल, त्यामुळे बोलायचे नाही. म्हणून संबंधित गोष्टीवर बोलायचे नाही, म्हणजे आपण तत्त्वहीन राजकारणाला पाठबळ दिल्यासारखे आहे. त्यामुळे युवकांनी परखड मत मांडून सामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले. पाकिस्तानच्या विरोधात बोलले म्हणजे खरा राष्ट्रवाद नव्हे. देशात राहून सामान्यांच्या विचाराची तोडफोड करायची. शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत. असा राष्ट्रद्रोही विचार कामाचा नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. 

loading image