RTO PHOTO
RTO PHOTO

आरटीओची वाहन चाचणी चार किलोमिटर दूरच्या मैदानात

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात वाहन चाचणी ट्रॅक अस्तित्वात आहे. असे असताना, आरटीओ कार्यालयाने रस्त्यावर चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात रस्त्यावर चाचणी न घेता, छुप्या पद्धतीने पैठण रस्त्यावरच्या मैदानावर चाचणी घेतली जात आहे. नागरिकांना मात्र चाचणीसाठी चार ते पाच किलोमिटरचा फटका सहन करावा लागत आहे. 

आरटीओ कार्यालयात वाहन चाचणी ट्रॅक सुस्थितीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. असे असताना अचानक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी कार्यालयातील ट्रॅकवर वाहन परवाण्याची चाचणी घेणे बंद केले. सुरवातीला मोटार ड्रायव्हिंगच्या विद्यार्थ्यांची रस्त्यावर चाचणी घेण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर आरटीओ निरिक्षकांनी रस्त्यावर चाचणी घेण्याऐवजी कर्णपुरा यात्रा मैदानात चाचणी घेणे सुरु केले. त्यामुळे ड्रायव्हींग स्कुलच्या विद्यार्थ्यांना चाचणीच्या नावाखाली बाहेर नेले जात होते. तर स्कुल व्यतीरिक्त आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र कार्यालयाच्या चाचणी ट्रॅकवर चाचणी द्यावी लागत होती. काही दिवस हा प्रकार सुरु होता, त्यानंतर कार्यालयाच्या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन सर्वच विद्यार्थ्यांची चाचणी कर्णपुरा यात्रा मैदानात घेणे सुरु केले. 

आता पैठण रस्त्यावरील मैदान 

कार्यालयाच्या परिसरातील ट्रॅकवर काही दिवस चाचणी घेतल्यानंतर आता मात्र पैठण रस्त्यावरील सिडकोच्या मैदानावर चाचणीसाठी नेले जात आहे. वाहन परवान्याच्या चाचणीसाठी उमेदवारांनी अगोदर आरटीओ कार्यालयात यावे लागते, त्यानंतर कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर पैठण रस्त्यावरील मैदानावर नेले जाते. आरटीओ कार्यालयात वाहन चाचणी ट्रॅक अस्तित्वात असताना दुरवर चार पाच किलोमिटर नेऊन मैदानात चाचणी घेण्याचे कारण उमेदवारांना मात्र समजण्याच्या पलिकडे आहे. 

ट्रॅकला पार्कींगचे स्वरुप 

आरटीओ कार्यालयाच्या आवारात असलेल्या चाचणी ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन या ठिकाणी वाहनांची पार्कींग करण्यात आली आहे. जप्त करुन आणलेली वाहने ट्रॅकवर उभी करुन ठेवण्यात येत असल्याने सुस्थित असलेला ट्रॅक वापराविना पडून आहे. त्यामुळे सध्याचा सुस्थितीत असलेल्या ट्रॅकवरच वाहन चाचणी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 

अधिकाऱ्यांचा बेबनाव 

आरटीओ कार्यालयात सध्या अधिकाऱ्यांमध्ये बेबनाव निर्माण झालेला आहे. सोयीस्कर पद्धतीने काम करण्याऐवजी गैरसोय करुन आणि अवास्तव पद्धतीने काम करण्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहन परवान्याची चाचणी कार्यालयाच्या ट्रॅकवर घेण्याऐजी मैदानात घेतली जात असल्याची आरटीओ कार्यालयात चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com