पाच दिवसाच्या अथक प्रवासानंतर गाठला देश, बहीण भाऊ पोंहचले मुंबईला सुखरूप

sister and brother reached Mumbai safely latur
sister and brother reached Mumbai safely latursakal

निलंगा : चिकडे पहावे तिकडे स्फोट, आकाशात हेलिकाॕप्टर, विमानाच्या घिरट्या, अक्राळ विक्राळ आगडोंब, कर्कश आवाज, नागारिकांचा जिव वाचवण्यासाठी आक्रोश अशा स्थितीत आपला देश कसा गाठेल एवढीच दिवास-रात्र चिंता. देश गाठला म्हणजे गाव गाठला अशी उर्मी मनात बाळगून आम्हा दोघाही बहीण-भावानी पाच दिवस अहोरात्र प्रवास करून पोलांड गाठले तेथील भारतीय वायुसेनेच्या मदतीने मुंबईला उतरलो अन् सुटकेचा निश्वास सोडला.अन् मायदेशी आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर होऊन भावूक झाला. ही प्रतिक्रिया होती होसूर ता. निलंगा तुषार गोरख म्हेत्रे व पल्लवी गोरख म्हेत्रे यांची. हे दोघेही शुक्रवारी ता. चार रोजी एक वाजता मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता या युक्रेन व रशिया युध्दाच्या स्थितीची माहीती दिली.

होसूर ता. निलंगा येथील गोरख म्हेत्रे हे सेवानिवृत्त माजी सैनिक असून त्यांची घरातील स्थिती बिकट असतानाही मुले अतिशय हुशार होती. सैन्यात असताना जमलेली पूंजी व निवृत्तीनंतर आलेले पैशाने भारतातील वैद्यकीय पदवीची बाब अतिशय खर्चीक असल्याने त्यांचा सन 2016 मध्ये युक्रेन या देशात शिक्षणासाठी गेले होते. यंदाचे शेवटचे वर्ष होते. एम.बी.बी.एस. पदवी हातात पडण्यासाठी केवळ तीन महीने बाकी असताना रशिया व युक्रेन युध्दाला सुरवात झाली. तुषार व पल्लवी म्हेत्रे हे दोघेही बाहीण भाऊ युक्रेनची राजधानी किव येथे शिक्षण घेत होतो. त्यामध्ये रशियाने युक्रेनवरती हल्ले सुरू केले त्यामध्येच युध्द कुठं तर थांबेल असे वाटत असतानाच युद्धाची तिव्रता वाढतच होती. त्यामध्येच विविध चॕयनलवरील बातम्या पाहून गावाकडून आई- वडीलांचा व नातेवाईकाचा रोज फोन सुरू होता. ज्या किव मधून आम्ही निघण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले त्या ठिकाणीही एअर फायरिंग व बाॕम्बहल्ले सुरूच होते. दोन दिवस रेल्वेने प्रवास करून हंगेरी सिमा गाठली त्यानंतर एका हाॕटेलमध्ये 12-13 तास थांबवले त्यानंतर एअर इंडीयाच्या विमाने मुंबई आलो. आपल्या देशात आल्यानंतर एकदा वाचलो रे बाबा... अशीच म्हणण्याची वेळ आली.

तुषार व पल्लवी हे दोन्ही भाऊ बहीण होसूर ता. निलंगा येथील असून त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या पाच वर्षापासून दोन्ही भाऊ बहीण एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेन ची राजधानी किव्ह येथे वास्तव्यास होते. त्यांच्या शिक्षणाचे हे शेवटचे वर्ष होते तीन महिन्यांमध्ये त्यांची डिग्री पूर्ण होऊन त्यांना एम बी बी एस सी पदवी मिळणार होती त्यामुळे ते लवकर त्या देशातून बाहेर निघू शकले नाहीत. दोन दिवसापासून ते रेल्वेने प्रवास करून युक्रेनची बॉर्डर क्रॉस करून ते मुंबई येथे आज उतरले वा मायदेशी परतले. त्याच्या पालकांनीचीही चिंता दूर झाली. दोन दिवसापूर्वी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तुषारच्या आई-वडीलाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत दगडू सोळुंके, तानाजी बिरादार, नरसिंग बिरादार, चंद्रकांत बिरादार व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com