esakal | राशिभविष्य : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काय घ्यावी काळजी... 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

गेल्या २४ जानेवारीपासून कुंभ राशीला साडेसाती चालू झाली आहे. धनु, मकर आणि कुंभ या राशीना सध्या साडेसाती आहे. २४ जानेवारीलाच वृश्चिक राशीची साडेसाती संपली. पण ज्या तीन राशींना सध्या साडेसाती आहे, त्यांचे राशीफल काय आहे, वाचा -

राशिभविष्य : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काय घ्यावी काळजी... 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात.

वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी शनीच्या सध्याच्या ग्रहदशेबद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

ज्योतिषाचार्य अनंत पांडव म्हणतात, की शनिमहाराज हे सर्व ग्रहांमध्ये न्यायाधीश आहेत. जे चांगले कार्य करतात, त्यांना शनी चांगले फळ देतो. जे वाईट कृत्ये करतात, त्यांना शनी शिक्षा देतो.

ग्रहराज शनिमहाराज हे सूर्य आणि छाया यांचा मुलगा आहेत, अशी श्रद्धा आहे. शनिवार हा शनिमहाराजांचा विशेष दिवस आहे. तसेच यमराज हा शनिमहाराजांचा भाऊ आणि यमुना ही बहीण आहे.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

धनू : आर्थिक वृद्धी होईल. आपण मुळातच एक उत्तम सल्लागार आहात. विद्वान आहात व सात्विक वृत्ती आहे. साडेसातीचे २०१८-१९ हे वर्ष पूर्णपणे खराब गेले. प्रत्येक कामात अडथळे व अपयश आले. परंतु आता मात्र तसे होणार नाही.

या वर्षात आर्थिक वृद्धी होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच बराचसा ओढा अध्यात्माकडे राहील. अचानक धनलाभाचेही योग आहेत. नोकरी/व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात येतील व त्यात यशही मिळेल.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

मकर : साडेसाती आहे, त्यामुळे अखंड सावधान राहा. आपला स्वभाव धीरगंभीर, भावनाप्रधान, शिस्तप्रिय आहे. लोकांचे आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. त्यात साडेसाती आली आहे. त्यामुळे मानसिक क्लेश खूप संभवतात.

कमालीचा एकांतवास जाणवेल. त्यामुळे आपणच शांतता, संयम ठेवावा. जिभेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. लेखक असाल, तर एखादी सुंदर कलाकृती आपल्याकडून लिहिली जाईल. पती/पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. कायदा मोडू नका. नाही तर अटक होण्याचे योग आहेत.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

कुंभ : साडेसातीला सुरवात झाली आहे. आपल्या लग्नेशाचे व्ययस्थानातून भ्रमण होत आहे. त्यामुळे कोणतेही कारण नसताना आपणाकडून नुकसान होऊ शकते. वास्तविक आपल्याला हुशारी व धूर्तपणा हे गुण मुळातच मिळाले आहेत. त्यामुळे नुकसान होणार नाही.

दक्षता घ्या. नोकरी/व्यवसायात दीर्घकालीन एखादी अडचण उभी राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांना निदान होण्यास अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव