esakal | मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांचीच इच्छा : माजीमंत्री निलंगेकर     
sakal

बोलून बातमी शोधा

निलंगा २३.jpg


निलंग्यात सकल मराठा समाजाच्या वतीने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर  यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलन कर्त्यांकडून निवेदन स्विकारताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागावा अशी इच्छा त्यांच्यात नाही. मात्र, आमचा कायम पाठींबा राहणार आहे. असेही त्यांनी सांगीतले.   

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांचीच इच्छा : माजीमंत्री निलंगेकर     

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये इच्छाशक्तीच नाहीये, असा आरोप माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा द्या, लोकप्रतिनिधी जागे व्हा, यासाठी  रविवारी (ता.२०) माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी निवेदन स्विकारताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सकल मराठा समाजाच्या वतीने माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सकाळी येथील शिवाजी चौकातून घंटानाद आंदोलनाला सुरवात झाली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करावे, शासकीय नोकरभरती थांबवावी, तालुका स्तरावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करा, आदी मागण्यासाठी माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी हा घंटानाद मोर्चा धडकला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी आंदोलनकर्त्यांना निवेदन देताना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, तत्कालीन सरकारच्या काळात आपण मराठा समाजाच्या आरक्षण समितीवर असताना आणासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून या समाजातील लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केला आहे. आरक्षणाचा मसूदा तयार करतांना तत्कालीन सरकारने अतिशय काळजी घेतली होती. शिवाय सुप्रिम कोर्टाकडून आरक्षणास स्थगिती मिळाली. तरी राज्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती असती तर आरक्षण टिकले असते, असा आरोप त्यांनी सध्याच्या महाविकास आघाडीवर केला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाय सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मराठा समाजातील शेतकऱ्यांना बसला आहे. आपला मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठींबा असून येत्या काळात समाजाच्या प्रश्नांसाठी कायम सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर हेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

यांची होती उपस्थिती 
मराठा समाजातील विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अशोकराव पाटील निलंगेकर, माजी सभापती बजरंग जाधव, दगडू सोळूंके, छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे, भगवान माकणे, मराठा सेवा संघाचे एम. एम. जाधव, विनोद सोनवणे, शाहूराज पाटील, प्रा. हंसराज भोसले, शाहूराज पाटील, ईश्वर पाटील, सतीश हानेगावे, डॉ. लालासाहेब देशमुख, शाहूराज थेटे, सुबोध गाडीवान, उत्तम शेळके यासह शेकडो मराठा बांधव व महीला विध्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 

(संपादन-प्रताप अवचार)