मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर 

file photo
file photo

नांदेड : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई)२५ टक्‍के मोफत प्रवेष प्रक्रियेत यंदा धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या धोरनात्मक बदलानुसार प्रवेशप्रक्रियेसाठी होणाऱ्या लॉटरी पद्धतीच्या फेऱ्यांना फाटा देत एकाच फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून  (ता. ११)  फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरवात करण्यात येत आहे.   

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्का कायद्यानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित शाळेत पटसंख्येच्या तुलनेत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे सात वर्षांत जिल्ह्यातील २५४ शाळेत नऊ हजार ६०१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाचा लाभ मिळाला आहे. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येते. गेल्यावर्षी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रवेश प्रक्रिया सुरूच होत्या. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य पालकांना बसला होता. यामध्ये पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य जागा रिक्तच राहिल्या. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेशाकडे कानाडोळा केला होता. त्या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी यंदा एकदाच प्रवेशाची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचानांदेडच्या वजिराबाद पोलिसांनी धरला ‘हा’ चोर
 
कागदपत्रांची जमाजमव करण्याचे आवहान 
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ठराविक कालावधीसाठी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, जागांच्या उपलब्धतेनुसार तीन हजार प्रवेशांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, लॉटरीनंतर जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया शाळा सुरू होण्या आगोदर, म्हणजे मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.  यंदा प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात येणार आहे. मागील वेळी लॉटरीत नंबर लागल्यानंतरही केवळ कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. येत्या (ता. ११) फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना कागदपत्रांची जमाजमव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पडताळणी 
मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ३०० शाळांनी उपलब्ध जागांची नोंदणी केली आहे. त्यानुसार पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशपात्र शाळा व नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी (ता. २१) जानेवारी ते (ता. सहा) फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. 

मोफत प्रवेशासाठी वेळापत्रक 
आरटीईद्वारे पालकांनी मोफत प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी (ता. ११) ते २९ दरम्यान, ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यानुसार मार्च (ता.११ व १२) मार्चला लॉटरी सोडत काढण्यात येणार आहे. लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी मार्च (ता. १६) ते (ता.तीन) एप्रिल दरम्यान तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी याच्याकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत जावून प्रवेश निश्‍चित करावयाचे आहेत.  त्यानुसार  एप्रिल (ता.१३) ते मे (ता.२२) पर्यंत प्रवेशाच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. 

शैक्षणिक वर्षनिहाय मोफत प्रवेश व शाळा 

शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेश
  • २०१३-१४
  •   ५२
  •    ४९२
  • २०१४-१५
  •    ६५
  •    ७५४
  • २०१५-१६
  •    १०५
  •    ९३२
  • २०१६-१७
  •    १६०
  •     ७३३
  • २०१७-१८
  •   १७४
  •     १७४३
  • २०१८-१९
  •    २३५
  •     २३४०
  • २०१९-२०
  •    २५४
  •     २६०७

शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन
 मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये  स्वयंसाह्यता शिक्षण संस्थांच्या मुख्यध्यापाकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निवड करण्यात आलेल्या शाळेच्या मुख्यध्यापकांनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांद दिग्रसकर यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com