esakal | या परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Secondery School Exam News

परीक्षा म्हटले की तणावाचे वातावरण असते. या वातावरणाचे आनंदात रूपांतर व्हावे म्हणून शहरातील अनेक शाळांनी दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छांबरोबरच गुलाबाची फुले देऊन स्वागत केले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील वातावरण आनंदाचे आणि लगबगीचे दिसून आले.

या परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लातूर: परीक्षा म्हटले की तणावाचे वातावरण असते. या वातावरणाचे आनंदात रूपांतर व्हावे म्हणून शहरातील अनेक शाळांनी दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छांबरोबरच गुलाबाची फुले देऊन स्वागत केले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील वातावरण आनंदाचे आणि लगबगीचे दिसून आले.

हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..  

शालेय जीवनात महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहीले जाते. त्यामुळे पहिला पेपर कसा जाईल, प्रश्नपत्रिकेत नेमके काय विचारले जाईल, सर्व प्रश्न वेळेत सोडवता येतील का... असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात. यातून तणावाची स्थिती उद्भवते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवतो. हीच काळजी बऱ्याच पालकांनाही असते. त्यामुळे ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्राच्या आवारात मंगळवारी (ता.तीन) पालकांची गर्दीही पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे म्हणून अनेक शाळांनी मुलांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे शाळेत स्वागत केले. तर काही शाळांत ध्वनीक्षेपकावरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या.

क्लिक करा- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...

लालबहादुर शास्त्री विद्यालयात प्रभुराज प्रतिष्ठान आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दहावीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन बिनधास्तपणे परीक्षा द्यावी, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असा संदेशही देण्यात आला. परीक्षेसंदर्भात किंवा अभ्यासासंदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या मित्रांशी, पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून त्या सोडवून घ्याव्यात. विनाकारण ताण घेऊ नये, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश सुनीता कंकणवाडी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अजय कलशेट्टी, मुख्याध्यापक नरेंद्र गिरवलकर, कल्पना भुरे, रामभाऊ लोखंडे, सौदागर लहाने, सुनील तळमारे, राजेश्वर हरनाळे, बालाजी साळुंके, मधुकर आलटे, संजीवनी पाटील, सुलभा पाटील, सुरेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते.  

हे वाचलंत का?-  गीतांजलीच्या चारित्र्यावर शरदला संशय होता, मग कपाशीच्या पऱ्हाट्यावरच...