सेनगावच्या नगराध्यक्षपदी ज्योती देशमुख, उपनगराध्यक्षपदी शालिनी देशमुख

शिवसेनेच्या ज्योती देशमुख नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
Sengaon Nagar Panchayat Election News
Sengaon Nagar Panchayat Election Newsesakal

सेनगाव (जि.हिंगोली) : सेनगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी गुरुवारी (ता.१७) निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या ज्योती देशमुख नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. सेनगाव नगरपंचायतमध्ये एकूण १७ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असे चित्र होते. त्यानुसार शिवसेनेकडे नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. नगराध्यक्षपदासाठी सेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांकडून तीन अर्ज सादर करण्यात आले होते. सेनगाव नगरपंचायतचा (Sengaon Nagar Panchayat)निकाल लागून तीन एक महिना होत आला. त्यामुळे नगराध्यक्षपद नेमके कुणाकडे जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Sengaon Nagar Panchayat Election Jyoti Deshmukh Elected As City President, Shalini Deshmukh As Deputy)

Sengaon Nagar Panchayat Election News
औंढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे खंदारे, उपनगराध्यक्षपदी देशमुख

गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली असून शिवसेना ५, राष्ट्रवादी ५ , तर काँग्रेस २ अशा १२ सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली आहे. तर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश आले आहे. सेनेला पहिले वर्ष नगराध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला दुसरे सव्वा वर्ष पद देण्यासाठी सहमती झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांना पहिले सव्वा मिळाले आहे. तर उपनगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख यांना मिळाले आहे. (Hingoli)

Sengaon Nagar Panchayat Election News
कित्येकांचे हास्य मोदी सरकारने हिरावले - राहुल गांधी

यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचे पाहायला मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com