स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सातव्यास्थानी असलेल्या जालन्यात कचरा संकलनाचा बट्याबोळ!  

उमेश वाघमारे 
Tuesday, 24 November 2020

अनेक प्रभागांमध्ये तब्बल दहा ते पंधरा दिवस घंटागाड्या कचरा संकलनासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना घरातील कचरा पुन्हा रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन व स्वच्छता विभागाने याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. परिणामी शहरात पुन्हा कचरा समस्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांनी या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्षवेधणे अपेक्षित आहे. 

जालना : जालना नगरपालिकेचा तीन महिन्यांपूर्वीच स्वच्छता सर्व्हेक्षण स्पर्धेत देशात 22 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीनंतर जालना शहरात नगरपालिकेकडून होणाऱ्या कचरा संकलनाचा पुन्हा फज्जा उडाला आहे. अनेक प्रभागांमध्ये तब्बल दहा ते पंधरा दिवस घंटागाड्या कचरा संकलनासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना घरातील कचरा पुन्हा रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन व स्वच्छता विभागाने याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. परिणामी शहरात पुन्हा कचरा समस्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांनी या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्षवेधणे अपेक्षित आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जालना नगरपालिकेचा स्वच्छता सर्व्हेक्षण स्पर्धेत सहभाग आहे. या स्पर्धेचा तीन महिन्यांपूर्वी निकाला लागला होता. यामध्ये जालना नगरपालिकेने देशात 22 वा तर राज्यात सातवा क्रमांक पटकावला होता. कारण शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी नगरपालिककडे 49 घंटागाड्या आहेत. तसेच चार टीप्पर, चार ढंपर ही आहेत. हे सर्व साहित्य असतांना नगरपालिकेकडून कंत्राटदाराकडून प्रत्येक भागात दोन ट्रॅक्टरव्दारे कचरा उचलण्यात येतो. त्यामुळे शहरातील सुमारे 75 ते 80  टक्के कचरा संलकन केला जात होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, मागील काही दिवसांपासून नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे पुन्हा दूर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पालिकेकडून किमान दोन दिवसांना तरी घंटागाड्यांच्या माध्यमातून घरातील कचरा संकलन करणे अपेक्षित आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, मागील काही दिवसांपासून दहा ते पंधार दिवसानंतरही शहरातील अनेक प्रभागांमध्ये घंटागाड्या फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून घरातील कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकला जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील कचराही दोन ते तीन दिवस उचलला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर आता पुन्हा कचरा दिसू लागला आहे. मात्र, हे सर्व होत असतांना नगरपालिका प्रशासनासह पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा अवघड झाला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे जालनावासीय मात्र त्रस्त झाले आहेत. 

 

नगरपालिकेच्या आठ ते दहा घंटागाड्या नादूरूस्त असल्याने काही ठिकाणी कचरा संकलनास अडथळा निर्माण होत आहे. या घंटागाड्या दूरूस्त झाल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाड्या नियमित सुरू होतील. 
-नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.

नगरपालिकेकडे 49 घंटागाड्या, चार टीपर, ढंपर व प्रत्येक प्रभागामध्ये दोन ट्रॅक्टर आहेत. त्याच्या माध्यमातून रोज कचरा संकलन केला जातो. शहरातील प्रभागांमध्ये रोज घंटागाडी फिरते. 
- राहुल मापारी, अभियंता, स्वच्छता विभाग, नगरपालिका, जालना.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seventh ranked Jalna in clean survey but started collecting garbage