एमजीएमसाठी शरद पवारांची जमीन गहाण - अंकुशराव कदम 

अतुल पाटील
Friday, 20 December 2019

मात्र, बॅंकेने आपल्याला इतक्‍या जलद बॅंक गॅरेंटी कशी दिली? असा पुन्हा प्रश्‍न पडला. तर याचे उत्तर मिळाले. पवार साहेबांनी स्वत:च्या आमराईच्या जमिनीची कागदपत्रेच बॅंकेला दिली होती. शरद पवारांनी त्यावेळी दिलेली ओंजळभर बीजे याठिकाणी पेरली. ते सांभाळण्याचे काम करतो. ते बीज शुद्ध आहे. त्यात वाढ होते आहे. बुनियादी शिक्षा या महात्मा गांधी यांच्या तत्वाने काम सुरु असल्याचे कदम यांनी सांगितले.

औरंगाबाद : एमजीएम विद्यापीठाचा शुभारंभ आज शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र, एमजीएमच्या पहिल्या महाविद्यालयासाठी खुद्द शरद पवार यांनीच स्वत:ची जमीन गहान ठेवली होती. असा खुलासा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी केला. हे सांगताना अंकुशराव कदम यांचा कंठ दाठून आला होता. काहीकाळ सभागृहदेखील स्तब्ध झाले होते. नंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

अंकुशराव कदम यांचा अमृतमहोत्सवी सत्कार श्री. पवार यांच्याहस्ते झाला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, एमजीएम उभारणीला शरद पवारांची मोठी मदत झाली. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यासाठी पत्र दिले. कमलबाबूंनी ते पत्र आमच्यासमोर ठेवले.

त्यानंतर आमचे उच्चपदस्थ काका शामराव कदम यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करत असल्याचे सांगितले. दहा लाख रुपये बॅंक गॅरेंटीबाबत विचारणा केली तर, त्यांनी आधी बालक मंदीर, शाळा नंतर कॉलेज सुरु करा, असा सल्ला दिला.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी  

पुढे काय असा प्रश्‍न होताच. कमलबाबूंना म्हटले, शरद पवारांना फोन करा. कमलबाबू अवाक्‌ झाले. तरीही फोन लावला आणि अडचण सांगितली. तिकडून शरद पवार म्हणाले, तुमच्याकडे किती पैसे आहेत? शंकर रुपये असल्याचे सांगितले. यावर साहेबांनी आम्हाला पुण्याला बोलावले. महाराष्ट्र बॅंकेचे अध्यक्ष पटवर्धन यांच्याकडे घेऊन गेले. यावेळी गप्पा झाल्या. चहा घेतला. हळूच विषय काढला बॅंक गॅरेंटीचा. तर, पटवर्धन साहेब होईन जाईल, असे म्हणाले. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

तीच बीजे मी सांभाळतोय.. 
त्यानंतर मात्र, बॅंकेने आपल्याला इतक्‍या जलद बॅंक गॅरेंटी कशी दिली? असा पुन्हा प्रश्‍न पडला. तर याचे उत्तर मिळाले. पवार साहेबांनी स्वत:च्या आमराईच्या जमिनीची कागदपत्रेच बॅंकेला दिली होती. शरद पवारांनी त्यावेळी दिलेली ओंजळभर बीजे याठिकाणी पेरली. ते सांभाळण्याचे काम करतो. ते बीज शुद्ध आहे. त्यात वाढ होते आहे. बुनियादी शिक्षा या महात्मा गांधी यांच्या तत्वाने काम सुरु असल्याचे कदम यांनी सांगितले. 

हेही वाचा - माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's land mortgage for MGM - Ankushrao Kadam