esakal | अतिवृष्टीने पाटोदा शहरातील प्राचीन शिवमंदिर कोसळले ! 
sakal

बोलून बातमी शोधा

patoda shivmandir.jpg

पावसामुळे शहरातील अतिप्राचीन असलेले संगमेश्वर मंदिराचा कळस कोसळल्याची घटना शुक्रवारी (ता.१६) रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाकडून या मंदिराला कोट्यावधी रुपये खर्चून त्याठिकाणी डागडुजी व बांधकाम करण्यात आले होते. 

अतिवृष्टीने पाटोदा शहरातील प्राचीन शिवमंदिर कोसळले ! 

sakal_logo
By
सुधीर एकबोटे

पाटोदा (बीड) : सलग तीन दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाचा जोरदार तडाखा सुरू आहे. या पावसामुळे शहरातील अतिप्राचीन असलेले संगमेश्वर मंदिराचा कळस कोसळल्याची घटना शुक्रवारी (ता.१६) रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाकडून या मंदिराला कोट्यावधी रुपये खर्चून त्याठिकाणी डागडुजी व बांधकाम करण्यात आले होते. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार मांडला आहे. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असताना आता याचा फटका जुन्या वास्तूंना देखील बसत आहे. शहरात जुने पोलिस स्टेशन भागात अतिप्राचीन हेमाडपंती रचनेचे शिवमंदिर आहे. मांजरा आणि साळ या दोन नद्यांच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिराला शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन वर्षांपूर्वीच पुरातत्व विभागाकडून या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी कोट्यवधी रुपये खर्चून या मंदिराचे बांधकाम व जुन्या रचनेची डागडुजी करण्यात आली होती. परंतु मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मंदिराचे शिखर ढासळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या या मंदिराचा कळस चार दिवसाच्या पावसाने ढासळल्याने पुरातत्व विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्चून नेमके काय काम करण्यात आले होते असा सवाल आता नागरिकांकडून  विचारण्यात येत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुरातत्व विभागाने केली होती दुरुस्ती 
पाटोदा शहरातील मांजरा व साळ नदीच्या संगमावर संगमेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. सदर मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी नुकताच लाखो रुपयाचा निधी मंजूर झाला होता. त्या माध्यमातून तीन वर्षात मंदिराची कामे करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अतिवृष्टीने मंदिराचा कळस कोसळल्याने अतिप्राचिन मंदिराचे काम पुरातत्व विभागाने केली की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  

(संपादन-प्रताप अवचार)