लॉकडाउनमध्ये शिवभोजनाचा भुकेल्यांना आधार 

जालना : शिवभोजन घेण्यासाठी जमलेले नागरिक.
जालना : शिवभोजन घेण्यासाठी जमलेले नागरिक.

जालना - लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवत १५ ठिकाणी एक हजार ५०० शिवभोजन थाळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये शिवभोजन योजना ही परजिल्ह्यातील जालना जिल्ह्यात अडकून पडलेले मजुरांसह गरजू कुटुंब, सरकारी रुग्णालयात रुग्णांसोबत येणारे नातेवाईक यांना आधार ठरत आहे. ता. २३ मार्च ते ता.१६ एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यात २० हजार ६८७ शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्स ठेवत फूडपॅकेटद्वारे भोजन देण्यात येत असून, येथे येणाऱ्यांसाठी सॅनिटायझर, साबण, पाणी आदी सुविधाही देण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये शिवभोजन योजनेंतर्गत भोजन वाटपाचा सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंतचा वेळ वाढवल्याने व केवळ पाच रुपयांमध्ये हे जेवण देण्यात येत असल्याने शिवभोजन योजनेची मागणी वाढल्याचे चित्र आहे. 

जालना शहरामध्ये पाच तर इतर तालुक्यांच्या ठिकाणी १० अशा एकूण १५ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबांना जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. जालना शहरातील पाच केंद्रांमधून दररोज ८०० व्यक्तींना तर इतर तालुक्यातील १० शिवभोजन केंद्रामधून ७०० गोरगरिबांना जेवण देण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे दररोज २०० थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शहरातील महिला रुग्णालयाच्या परिसरामध्ये श्री भोजनालयाच्या माध्यमातून दरदिवशी २०० थाळी, रेल्वेस्टेशन येथे असलेल्या पुदिना रेस्टॉरंटच्या माध्यमातून २०० थाळी, बसस्टँडसमोर असलेल्या महाराजा हॉटेलमधून १०० थाळी जेवण गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोंढा परिसरामध्ये मजुरांची मोठ्या प्रमाणात संख्या असते. या ठिकाणी साई भोजनालयाच्या माध्यमातून दररोज १०० थाळी जेवण देण्यात येत आहे. 
बदनापूर शहरामध्ये दोन ठिकाणी शिवभोजन केंद्र चालविण्यात येत असून, एकूण १०० थाळी जेवण दररोज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जाफराबाद येथे दोन ठिकाणी २००, अंबड दोन ठिकाणी एकूण १००, घनसावंगी दोन ठिकाणी एकूण १०० थाळी, परतूर येथे १०० तर भोकरदन येथील १०० थाळ्या शिवभोजन नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com