सीना-कोळेगाव प्रकल्पाने गाठली शंभरी, चार दरवाजे खुले !

आनंद खर्डेकर 
Wednesday, 14 October 2020

कोळेगावप्रकल्पाचे चार दरवाजे उचलण्यात येताच सीना नदीत पाणी सुटले आहे. 

परंडा (उस्मानाबाद) : अहमदनगर जिल्हयात व तालुका परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे सीना-कोळेगाव धरण शंभर टक्के भरले आहे. प्रकल्पात मोठया प्रमाणात पाणी येत असल्याने मंगळवारी (ता.१३) रात्री उशीरा प्रकल्पाचे दोन दरवाजे उचलण्यात आले, तर पाण्याचा वेग कायम असल्याने पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आले. दोन टप्प्यात चार दरवाजे उचलण्यात आलेले आहे. चार दरवाज्यातून दोन हजार चारशे क्युसेस दराने पाणी सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सततच्या पावसामुळे अनेक दिवसापासून सर्वच नदी नाले खळाळून वाहत होते. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना-कोळेगाव प्रकल्पावरील सर्वच प्रकल्प भरल्याने सीना नदीला मोठया प्रमाणात पाणी आले होते. तर खैरी प्रकल्प (सातेफळ ता. जामखेड) पांढरेवाडी हे प्रकल्प पूर्ण भरल्याने यातील पाणी थेट सीना -कोळेगाव प्रकल्पात जमा होत होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर खंडेश्वरवाडी प्रकल्पाच्या भरावाला भेग पडल्याने सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ सुरूच होती. यातच मागील चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने प्रकल्पातील पाणी साठयात सातत्याने वाढ सुरूच होती. पाण्याचा वाढता दाब लक्षात घेता सीना-कोळेगाव प्रशासनाने सोमवारी (ता.१२) सीना नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करून नदी काठच्या गावांना सुरक्षिततेच्या सुचना दिल्या होत्या.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धरण शंभर टक्के भरल्याने मंगळवारी (ता.१३) रात्री दोन टप्यात धरणाचे चार दरवाजाचे उचलण्यात आले. व सीना नदी पत्रात पाणी सोडण्यात आले.सीना - कोळेगावप्रकल्प भरल्याने शेतकरी सुखावला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sina-Kolegaon dam hundred percent full four gates open