esakal | सिरो सर्व्हेक्षण अहवाल : सर्वाधिक पॉझिटिव्ह जळगाव जिल्हा, बीड जिल्ह्यात सर्वात कमी संख्या
sakal

बोलून बातमी शोधा

sir0.jpeg

- सिरो सर्व्हेत २५.९ टक्के बाधीत
- बीड जिल्ह्यात सर्वात कमी ७.४ टक्के
- आयसीएमआर कडून आरोग्य विभागाला अहवाल

सिरो सर्व्हेक्षण अहवाल : सर्वाधिक पॉझिटिव्ह जळगाव जिल्हा, बीड जिल्ह्यात सर्वात कमी संख्या

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणूचे संसर्गाचे प्रमाण किती याचा अंदाज काढण्यासाठी आयसीएमआर (इंडियन काऊन्सील ऑफ मेडिलक रिसर्च) ने राज्यातील चार जिल्ह्यांत केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक पॉझिटीव्ह रेट जळगाव जिल्ह्यात आढळला आहे. तर, सर्वात कमी बीड जिल्ह्यात आढळला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस राज्यातील पाच जिल्ह्यांत दुसऱ्यांदा केलेल्या सिरो सर्व्हेत जळगाव जिल्ह्यात २५.९ टक्के बाधीत असल्याचे आढळले आहे. तर, बीड जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ७.४ टक्के बाधीत आढळले. केंद्राचे आरोग्य सचिव तथा आयसीएमआरचे महानिदेशक पद्मश्री प्रो. डॉ. बलराम भार्गव यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना याबाबतचा अहवाल पाठविला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण शोधण्यासाठी आयसीएमआरचे राज्यातील प्रतिनिधी डॉ. ऋषीकेश आंधळकर यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात ३० ऑगस्टला हा सर्व्हे केला हेाता. यापूर्वी मे महिन्यात असाच सर्व्हे झाला होता. दुसऱ्यांदा बीड, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह सांगली व अहमदनगर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात सिरो सर्व्हे  करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक पॉझिटीव्हचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात आढळले. तर, बीड जिल्ह्यात सर्वात कमी आढळले. जळगाव जिल्ह्यात २५.९ टक्के तर बीड जिल्ह्यात ७.४ टक्के कोरोना पॉझिटीव्हचे प्रमाण आढळले. मे महिन्यांत सर्व्हे केला तेव्हा बीड जिल्ह्यात साधारण २० रुग्ण होते. तेव्हा चारशे लोकांच्या पाहणीत एक टक्का प्रमाण आढळले होते. यावेळी सर्व्हे केला तेव्हा बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या साडेपाच हजार होती. त्यावेळी हे प्रमा ७.४ टक्के आढळले आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाखांच्या घरात आहे. यावरुन पॉझिटीव्ह प्रमाणाचा अंदाज येतो.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

मराठवाड्यात परभणीत सर्वाधिक

दरम्यान, या पाहणीत मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत परभणी जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट सर्वाधिक आढळला आहे. परभणीत पॉझिटीव्हचे शेकडा प्रमाण १५.२ टक्के आहे. 

जिल्हानिहाय पाहणी व पॉझिटीव्ह प्रमाण

जिल्हा :    सॅम्पल संख्या     पॉझिटीव्ह रुग्ण  :    टक्केवारी

  • बीड :          ४४३ :           ३३                    ७.४. 
  • परभणी :     ४८०             :७३                   १५.२.
  • नांदेड  :       ४३९              ४३                   ९.८.
  • सांगली :      ४६७             ५५                    ११.७.
  • अहमदनगर : ४४७ :          ३९                    ८.७२.
  • जळगाव :      ४०५          :१०५                    २५.९.

(संपादन-प्रताप अवचार)