
कालव्याच्या भरावसाठी पाडलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले होते. जनावरे त्या डोहात पोहताना दिसली. म्हणून भाऊ जनावरांना हाकण्यासाठी पाण्यात उतरला. आणि तो बुडू लागला. तेवढ्यात बहिणीने हे पाहिले. मोठी बहिणीची वेडी माया. तिने भावाला वाचविण्यासाठी उडी मारली. मात्र, काळाने त्या दोघांवरही घाला घातला. त्यात बहिण भावाचा मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालूक्यातील यमलवाडी येथे घडली.
निलंगा (लातूर) : यलमवाडी ता. निलंगा येथून जाणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भरावसाठी शासनाने पाडलेल्या खड्ड्यात जनावरे राखण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा गुरूवारी (ता.18) पडून मृत्यू झाला आहे. कृष्णा विजय राजे (9 वर्षे) व पुजा विजय राजे (वय 11) असे मृत बहिण भावाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालूक्यातील यलमवाडी गावातील कृष्णा विजय राजे (वय 9 वर्षे) व पुजा विजय राजे (वय11) यांच्यासह गावातील अनेक लहान मुले जनावरे चारण्यासाठी निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या बाजूने सकाळपासून गेले होते. निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भराव भरण्यासाठी शासनाने जवळपास तीन एकर क्षेत्र संपादीत केले होते. या कालव्याच्या भरावासाठी वाहण्यात आलेल्या मुरूम व दगडामुळे तेथे मोठा खड्डे निर्माण झाले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरला असून शिवारातील विहीरी भरून वाहील्या. त्याचबरोबर भराव भरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे नेमका खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज देखील हल्ली येत नाही. त्यामुळे हा परिसर धोकादायक बनला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शाळा सुरु नसल्याने हल्ली गावाकडील मुले आई वडीलांना शेतीच्या कामात शक्य तशी मदत करीत आहे. त्याचप्रमाणे यलमवाडी येथील कांही शाळकरी मुले दररोज आपले गुरे घेऊन चारण्यासाठी जात असत. त्यातच कृष्णा व त्यांची बहीण पुजा हे दोघेही आपले जनावरे घेऊन चारण्यासाठी गेले. त्यावेळी पाण्यात गेलेल्या जनावरांना हाकण्यासाठी नऊ वर्षाच्या कृष्णाने पाण्याजवळ गेला. त्यात त्याचा पाय घसरुन तो पडला. भाऊ पाण्यात बुडत असल्याचे दिसताच बहिण पुजाने डोहात उडी मारली. दोघांनाही पोहणे येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान यावेळी गुरे राखण्यासाठी अनेक मुले आजूबाजूला होती. त्यांना ही घटना दिसत होती. मात्र कोणालाही पोहता येत नसल्याने त्यांनी धावत पळत गावकऱ्यांना सांगीतले. मात्र, तोपर्यंत उशीरा झालेला होता. ही घटना पोलिसांना कळविण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)