esakal | परळी जलयुक्त शिवार योजनेचा घोळ : कृषी अधिकाऱ्यांसह सहा जणांवर होणार गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Jalyukta_Shivar_3.jpg

जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परळी तालुक्यातील बोगस कामांची पाहणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील दक्षता पथकाने ही पाहणी केल्यानंतर कामे न झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस दिली होती. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कळविले आहे. 

परळी जलयुक्त शिवार योजनेचा घोळ : कृषी अधिकाऱ्यांसह सहा जणांवर होणार गुन्हा दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत परळी तालुक्यातील अनेक कामे झाली नसल्याचे आणि अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. भताने यांच्यासह सहा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परळी तालुक्यातील बोगस कामांची पाहणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील दक्षता पथकाने ही पाहणी केल्यानंतर कामे न झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस दिली होती. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कळविले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी परळीचे तालुका कृषी अधिकारी ए. ए. सोनवणे यांना याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले आहे व तसे आदेश दिलेले आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. भताने, अंबाजोगाईचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ, परळीचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी बी. बी. बांगर, कृषी सहायक एस. एस. गव्हाणे, एस. एस. जायभाये आणि श्रीमती के. एन. लिमकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)