गौरीच्या स्वागतासाठी मातीविना उगविले 'धन'

umarga 22.jpg
umarga 22.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : शहर व तालुक्यात गणेशाची स्थापना घरोघरी उत्साहात झाली. त्याला लागूनच असलेल्या गौरी सणाच्या आगमनाची उत्सुकतेने महिला जोरात तयारी करीत आहे. गौरीच्या सजावटीसाठी महिला वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, मुर्त्या ठेवून आकर्षक सजावट करतात. 

सजावटीचा एक भाग म्हणून महिला शेतातून माती आणून त्यात गहू बोटाने टोचून लावतात. ते धन येण्यासाठी जवळपास दहा ते बारा दिवस लागतात. मात्र या वर्षी कडदोरा (ता. उमरगा) येथील प्रदीप बालकुंदे यांच्या संकल्पनेतून गावातील महिलांनी मातीशिवाय हाइड्रो पॉनिक पद्धतीने धन लावले आहे . त्याची वाढ जोमाने होऊन अगदी सात ते आठ दिवसात ते आकर्षक दिसत आहे.

पारंपरिक पद्धतीने आपले सण साजरे होत असताना त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अशा तंत्रज्ञानाचा प्रसार सर्वत्र होईल आणि महिलांना त्याची कला सुध्दा अवगत होईल. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे आपणाला तंत्रज्ञानाची माहिती होते. पण ते तंत्रज्ञान समाजातील तळागाळातील घटकांना माहिती होऊन ते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली. तंत्रज्ञान सर्वत्र वेगाने पसरेल आणि त्याचा फायदा सर्वांना होईल.

याच उद्देशाने श्री. बालकुंदे यांनी फक्त पाणी आणि मोजकेच धान्य पाण्यात मिसळून अतिशय कमी कालावधीत गव्हाचे धन तयार करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले. ते यशस्वी सुद्धा झाले आहे. वनमाला बालकुंदे, संगीता कुंभार, लक्ष्मी सुतार, सुनीता रणखांब, श्रीदेवी कुंभार, दिपाली भोसले, शोभा रणखांब यांनी उत्साहाने यात सहभाग नोंदवला. शिक्षक बशीर शेख यांचेही या आधुनिक उपक्रमासाठी मिळाले. 

(संपादन-प्रताप अवचार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com