एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हातात फलकासह कटोरा घेऊन बाजारपेठेत मागीतली भिक | Osmanabad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हातात फलकासह कटोरा घेऊन बाजारपेठेत मागीतली भिक

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हातात फलकासह कटोरा घेऊन बाजारपेठेत मागीतली भिक

कळंब : प्रजाक सत्ताक(rebulic day) दिन सर्वत्र साजरा होत असताना एसटीचे कर्मचारी(st workers) मात्र संपावर आहेत.शासनाकडून अद्यापही तोडगा काढण्यात येत नसल्याने प्राजाकसत्ताक दिनादिवशी बुधवार (ता.२६) शहरातील बाजारपेठेत कळंब येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी भिक मागो आंदोलन करून राज्य शासनाचा व एसटी प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांचे भीख मागो आंदोलन

राज्य शासनामध्ये एसटी महमंडळाचे विलगीकरण करण्यात यावे,या व अन्य मागण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून कळंब येथील आंदोलक एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.एसटी प्रशासनाने आंदोलक कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा देखील उगारला आहे.अशा परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यावर भिक मागण्याची वेळ ओढवली आहे.शासन व एसटी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कळंबच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी हातात कटोरे घेऊन एसटी अगार ते शहरातील बाजारपेठेत भीक मागून भीक मागो आंदोलन केले आहे.प्राजाकसत्ताक दिनाच्या दिवशी या अनोख्या पद्धतीने शासन व एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे.प्रवाशांनी व शहरातील व्यापारी,नागरिकांनी आंदोलक कर्मचाऱ्याच्या कटोऱ्यात भीक टाकून या आंदोलनात कर्मचाऱ्यांना प्रतिसाद दिला.

हेही वाचा: IPL 2022 : लखनौच्या राहुलचा 'या' आफ्रिकी खेळाडूंवर डोळा

कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आपले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र केलेले असताना प्रशासनाकडून यावर तोडगा काढला जात नाही.यात कर्मचाऱ्यांनी ही ताठर भूमिका घेतली आहे.शासन व आंदोलक कर्मचाऱ्यांनी दोन पावले माघे सरकून तोडगा काढणे आवश्यक असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.कर्मचाऱ्यांनी बुधवारी भीक मागून भीक मागो आंदोलन करताना शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.'सरकार तुपाशी,कर्मचारी उपाशी'असे फलक हातामध्ये घेवुन एसटी कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत फिरूण भिक मागत हे आंदोलन केल.

राज्यशासन एसटी विलीनीकरणाबाबत(st merge in state governement) दुर्लक्ष करत असुन गेली तीन महीण्यापासुन कर्मचाऱ्यांच्या पगारी(salary) देखील करण्यात आल्या नाही.त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.या सरकारवर आमचा विश्वास राहीला नाही त्यामुळे जनतेलाच आम्ही झोळी पसरूण आमचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी भिक मागत आहोत आता तरी सरकारने आमच्या विलीनीकरणाच्या मागणीचा विचार करावा अस कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितल

Web Title: St Employees Begged In The Market With A Bowl In Their Hands

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..