लातुरात राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेला सुरवात

हरी तुगावकर
Wednesday, 4 December 2019

  • राज्यभरातील 400 खेळाडूंचा सहभाग
  • राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार संघ
  • डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन
  • वैदेही पवारने दिली खेळाडूंना शपथ

लातूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात ता. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अमॅच्युअर महाराष्ट्र किक बॉक्‍सिंग संघटनेचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, सचिव प्रविण काळे, महाराष्ट्र किक बॉक्‍सिंग संघटनेचे सचिव बापु घुले, किक बॉक्‍सिंग संघटक मंदार पनवेलकर, लातूर किक बॉक्‍सिंग संघटनेचे खय्युम तांबोळी, शोएब सय्यद उपस्थित होते.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

या स्पर्धेमधून लुधियाना(पंजाब)येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती कसगावडे यांनी यावेळी दिली. या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकूण आठ विभागातून 400 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. 

खेळाडूंना शपथ

स्पर्धेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ईटनकर यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. वैदेही पवार या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी आभार मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मदनलाल गायकवाड, कृष्णा केंद्रे, तानाजी मोरे, जयराज मुंढे, चंद्रकांत लोदगेकर व सुरेंद्र कराड यांनी पुढाकार घेतला. 

तिला करायचे होते मॉडेलिंगमध्ये करिअर पण...

सोशल मिडियावर गाजताहेत परभणीचे संजय राऊत 

बुधवारच्या स्पर्धेतील निकाल 
14 वर्षांखालील मुली ः 
24 किलो गट ः 1) मयुरी रावरकर, पुणे 2) प्रिती मसराम, नागपूर 3) अनुराधा ढाकरे, नाशिक व जानवी सोळंकी, औरंगाबाद 
28 किलो गट - 1) अंजली रोमन, कोल्हापूर 2) प्रियंका साठे, मुंबई 3) इश्वरी जपे, पुणे आणि प्रांजल आव्हाड, औरंगाबाद 

सवय करून घ्या, पुढे बिबटे येतच राहणार...

17 वर्षांखालील मुली 
35 किलो गट ः 1) तेजश्री मळेकर, मुंबई 2) पायल वारे, पुणे 3) पल्लवी चव्हाण, औरंगाबाद व पपिता कोकरे, कोल्हापूर 
40 किलो गट ः 1) खुशी रेवाळे, पुणे 2) गायत्री आसची, नागपूर 3) अनुराधा सोनवणे, लातूर व ऋतुजा पवार, औरंगाबाद 

19 वर्षांखालील मुली 
45 किलो गट ः 1) सिध्दी जाधव, मुंबई 2) प्रियंका पावरा, पुणे 3) दिशा जोशी, औरंगाबाद 
48 किलो गट ः 1) निकिता किरसुर, कोल्हापूर 2) गौरी सावंत, पुणे 3) राजश्री गाडेकर, औरंगाबाद व स्नेहल साळवे,अमरावती. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State level kick boxing competition begins in Latur