नगर-जामखेड बसवर आष्टीजवळ दगडफेक, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

कामावर हजर झालेले कर्मचारी नगरहुन जामखेडला प्रवासी घेऊन निघाले होते.
Stones Pelting On ST Bus And Beed News
Stones Pelting On ST Bus And Beed Newsesakal

आष्टी (जि.बीड) : जामखेड अगाराच्या नगर-जामखेड या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जामखेड (जि. नगर) आगारातही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्यामार्फत बससेवा सुरू करण्यात येत आहे. कामावर हजर झालेले कर्मचारी नगरहुन जामखेडला प्रवासी घेऊन निघाले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जामखेड आगाराची नगर-जामखेड बस (एएच 40 एक्यु 6224) सुमारास नगरहून जामखेडकडे निघाली होती. बस आष्टी (Ashti) जवळ गांधनवाडी फाटा येथे आली असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दगडफेक करून हल्लेखोर पळून गेले. बसचालकाने बस आष्टी पोलिस ठाण्यात (Beed) नेऊन तेथे फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.(Stones Pelting On Ahmednagar Jamkhed ST Bus Near Ashti Of Beed)

Stones Pelting On ST Bus And Beed News
हिंगोलीत वैध कारणाशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, पोलिसही तैनात

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जामखेड आगारातून गेल्या काही दिवसांपासून नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बसफेऱ्यांमुळे कोणीतरी अज्ञातांनी ही दगडफेक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या दगडफेकीमुळे कामावर हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com