श्रमिक घरी परतले अन् कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला... 

श्रमिक घरी परतले अन् कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला... 

परभणी : तामीळनाडू राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील ६८३ प्रवासी मदुराई येथून विशेष  श्रमिक रेल्वेने परभणीत सोमवारी (ता.२५) दाखल झाले आहेत. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून चिंतेत असलेले कुटुंबिय कोणाचे वडिल, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, पती सुखरुप घरी परतल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.

केंद्र शासनाने मागील काही दिवसापासून विशेष श्रमिक रेल्वे धावत आहेत. त्याद्वारे विविध राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना आणले जात आहे. विशेष रेल्वेला परभणी आणि मनमाड हे दोनच थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे परभणीत उतरलेल्या प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यात नेऊन सोडले जात आहे. तामीळनाडू राज्यातील मदुराई येथून निघालेली विशेष रेल्वे सोमवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता परभणी रेल्वे स्थानाकावर दाखल झाली. त्यातून ६८३ प्रवासी उतरले आहेत. त्या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करत त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या बसद्वारे रवाना करण्यात आले. 

हेही वाचा व पहा : Video : सायरन वाजवून पोलिसांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा....
 
घराकडे जाण्याची लागलेली ओढ
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, नायब तहसिलदार भगत, आगार प्रमुख दयानंद पाटील, पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्यासह महापालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. अनेक महिण्यानंतर रेल्वे स्थानक गजबजले होते. परंतु सोमवारी पूर्वीसारखा आवाज, गाड्याची वाट पाहत बसलेले प्रवाशी, विक्रेत्यांचा आवाज, गाड्यांची ये-जा, ध्वनिक्षेपकावरील सुचना असे कोणतेही चित्र नव्हते. केवळ हताश, हतबल झालेले चेहरे, घराकडे जाण्याची लागलेली ओढ आणि भिती एवढे चित्र दिसुन आले.

एकुण प्रवासी संख्या
परभणी १९७, बीड ३१०, हिंगोली ६०, वाशीम २९, यवतमाळ ४, लातूर २५, उस्मानाबाद २, बुलढाणा २५, नांदेड ९, जालना ३, एकुण ६८३

रविवारी आले १२६
रविवारी लातूर १८, सोलापूर २०, उस्मानाबाद १, नांदेड ४४, हिंगोली ३, जालना ८, औरंगाबाद १५ असे १२६ प्रवाशी काचीगुडा-मनमाड रेल्वेतून उतरले होते.


परभणीहून पाठवले १४९
परभणी जिल्ह्यात विविध भागात अडकलेल्या बिहार राज्यातील १४९ मजुरांना सोमवारी (ता.२५) नांदेड येथून विशेष रेल्वे बिहारकडे रवाना करण्यात आले आहे. त्यामध्ये सेलु ३६, पाथरी ३०, परभणी ३७, जिंतूर २०, पूर्णा २६ अशा मजुरांचा समावेश आहे. हे मजुर बसमधून नांदेडला पाठवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com