धक्कादायक! कमी गुणांमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या 

धावडा : विहिरीजवळ झालेली ग्रामस्थांची गर्दी. इन्सेटमध्ये  किरण सपकाळ.
धावडा : विहिरीजवळ झालेली ग्रामस्थांची गर्दी. इन्सेटमध्ये  किरण सपकाळ.

पारध (जि. जालना) -  बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने धावडा (ता. भोकरदन) येथे एका विद्यार्थ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली आहे. 

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जालना जिल्ह्यातील धावडा येथील विद्यार्थी किरण भगवान सपकाळ (वय १८) याचा बारावीचा निकाल गुरुवारी (ता. १६)जाहीर झाला. त्याला अपेक्षेप्रमाणे कमी टक्केवारी मिळाली. त्यामुळे तो निराश झाला होता. त्यातून तो घराबाहेर पडला होता. तेथून शिवारातील स्वतःचे शेत गाठत त्याने रात्री विहिरीत उडी घेतली. 

तो बेपत्ता असल्याचे लक्षात येतात नातेवाइकांनी त्याचा शोघ सुरू केला. त्यात शुक्रवार सकाळी शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती ईश्वर सपकाळ यांनी शुक्रवारी पारध पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तेथे विहिरीतून ग्रामस्थांच्या मदतीने किरणचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती कळताच विहिरीजवळ मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

दरम्यान, घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर वालसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. डॉ. अशोक वाघमारे यांनी उत्तरीय तपासणी केली. याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास जमादार प्रदीप सरडे, विकास जाधव, जीवन भालके आदी करीत आहेत. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com