school test.jpg
school test.jpg

उमरग्यात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रमच!

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय उशीरा घ्यावा लागला मात्र हा निर्णय घेताना शिक्षकांची कोरोना चाचणी स्वॅब पद्धतीने (आरटीफिसियल) घेण्याची पहिल्यांदा सूचना करण्यात आली. पुन्हा वेळेअभावि अन्टीजेन चाचण्या (रॅपीड) घेण्याचा निर्णय झाला. रॅपीड चाचण्याचा अहवाल शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक येत असला तरी स्वॅबच्या चाचण्याच्या अहवालात शिक्षक पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने आता रॅपीड चाचण्याच्या निष्कर्षाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने सोमवारपासुन (ता.२३) सुरू होणाऱ्या शाळेच्या निर्णयाबाबत संभ्रमवस्था आहे. 


संपूर्ण राज्यात कोरोनाचा काहूर सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासुन लॉकडाउन सुरू झाले. रुग्ण संख्येनुसार मंध्यतरी लॉकडाउनमध्ये शिधिलता देण्यात आली होती मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासुन इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. तत्पूर्वी करायवाच्या नियोजनाला किमान पंधरा दिवसाचा कालावधी मिळणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही. शिक्षकांची खात्रीशीर कोरोना चाचणी ही स्वॅब पद्धतीने व्हायला हवी होती, पहिल्यांदा हा निर्णय झाला मात्र त्यासाठी लागणारा मोठा कालावधी, चाचण्या तपासणीवरच्या मर्यादा या बाबीमुळे रॅपीड चाचण्या घेण्याचा निर्णय झाला त्यानुसार गट शिक्षण कार्यालयाने नियोजन करून गेल्या तीन दिवसापासुन चाचण्या सूरू केल्या. सुदैवाने या चाचण्याचा निष्कर्ष शिक्षकांच्या आरोग्यासाठी योग्य ठरत आहे मात्र या चाचण्या परिपूर्ण निष्कर्षापर्यंत जात नसल्याच्या चर्चेने शिक्षकासह विद्यार्थी, पालकामध्ये धाकधूक  आहे.


४८ स्वॅबच्या चाचण्यात सात शिक्षक पॉझिटिव्ह ; पाचशे रॅपिड चाचणीत मात्र दोघेच पॉझिटिव्ह !
गेल्या तीन दिवसापासुन शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरु आहेत. पहिली ते नववीपर्यंतच्या शिक्षकांची संख्या ६२३ आहे त्यापैकी जवळपास ८५ टक्के शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत शिक्षकांची चाचणी दोन दिवसात पूर्ण होईल. आत्तापर्यंत घेतलेल्या शिक्षकांच्या ४८ स्वॅब पैकी शहरातील दोन शाळातील सात शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी (ता. २१) उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड चाचणीत सर्वच ८६ शिक्षक निगेटिव्ह आढळून आले. मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात सर्व ३५ शिक्षक निगेटिव्ह आढळून आले. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात शिक्षकासह अन्य व्यक्तीच्या २२८ झालेल्या तपासणीत समुद्राळचा एक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान रॅपीड आणि आरटीफिशियल चाचण्याच्या तपासणीतील निष्कर्षाबाबतची चर्चा शाळेची घंटा वाजण्याची वेळ जवळ आल्यानंतर सुरू झाली आहे. कांही शिक्षक संघटनेने शाळा सुरू करण्याअगोदर चाचण्यांची घाईगडबड धोक्याची ठरू शकते असे मत व्यक्त केले आहे. रॅपीड चाचण्यातील अचूकता शंभर टक्के असू शकत नाही. असे कांही डॉक्टर्सचे मत समोर येत आहे. 

शाळा सुरुचे संकेत मात्र धाकधूक कायम !
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून नियमावलीनुसार शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र शिक्षकच पॉझिटिव्ह येत असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतात का नाही पहावे लागेल. एक दिवसाआड पन्नास टक्के विद्यार्थी वर्गात पाठवायचे आहे त्यात विज्ञान, गणित व इंग्रजी या तीन विषयाचे अध्यापन करायचे आहे. दरम्यान कोरोना चाचणीत शहरातील तीन शाळेतील आठ व ग्रामीण भागातील एका शाळेतील एक शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने या शाळेचे करण्याचे निर्जंतूकीकरण करण्याचे काम सुरू आहे. आता सोमवारी विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com