वाढदिवसालाच विद्यार्थ्याची आत्महत्या, अंकुशनगरातील घटना.  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

जालन्यातील अंकुशनगर येथे राहणार्या दहावीतला अभिजितने टोकाचे पाऊल उचलले. आज दसरा सण त्यातच अभिजितचा वाढदिवस असा मुहुर्त लागून आला. मात्र, त्याच्या मनात काय सुरू होते हे तर नियतीच जाणे. अभिजीतने अखेर रविवारी सायंकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण अंकुशनगरावर शोककळा पसरली. 

अंकुशनगर (जालना) : एका पंधरावर्षीय शालेय विद्यार्थ्याने वाढदिवसालाच गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. अंकुशनगर येथे ही घटना दसऱ्याच्या दिवशी रविवारी (ता.२५) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ सहकारी बँके शेजारी राहणाऱ्या अभिजित नंदकुमार बांगर (वय १५) याने घरातील दरवाजे बंद करून फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आत्महत्या केली. विशेष म्हणजे रविवारी त्याचा वाढदिवस होता. तो बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने आई-वडिलांनी जाऊन पाहिले, तेव्हा त्यांना अभिजितने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. अभिजित हा अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुणवंत विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. दरम्यान, शहागडच्या आरोग्य केंद्रात त्याला उत्तरीय तपासणीसाठी हालविण्यात आले. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिजितने हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide school boy ankushnagar jalna district news