मोफत नोकरी देणारे अशी होती सुंदरराव सोळंकेंची ओळख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच राजकीय पदांच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या. मोफत नोकरी देणारे, अशीच त्यांची ओळख होती असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

माजलगांव (जि. बीड) : राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच राजकीय पदांच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या. मोफत नोकरी देणारे, अशीच त्यांची ओळख होती असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

माजलगांव येथील सोळंके महाविद्यालयात सुंदरराव सोळंके यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शनिवारी (ता. 25) श्री. पवार बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदिप क्षीरसागर, संजय दौंड, अशोक डक, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, डी. के. देशमुख उपस्थित होते. 

वाचा : वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

श्री. पवार म्हणाले, 2014 हे वर्षे अडचणींचे व त्रासदायक ठरले. या वर्षांत गोपीनाथराव मुंडे, सुंदरराव सोळंके यांच्या निधनाच्या दुर्देवी घटना घडल्या. सीएए, एनआरसीमुळे देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वांनी सलोखा ठेवण्याची गरज आहे. तसेच शिक्षणाचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. 

हेही वाचा - मनोरुग्णांना इथे मिळणार पूर्ण उपचार  

नजीकच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचादेखील प्रश्न मिटणार असून, खरीप हंगामात बळीराजा स्वतःच्या पायावर उभा राहील, यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द असल्याची ग्वाहीही अजित पवार यांनी दिली. माजलगाव शहरात अद्यावत नाट्यगृह उभारण्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sundarrao Solanke Ajit Pawar News Majalgaon Beed