शिक्षकांचे अपडाऊन; कोरोना वाढीसाठी धोकादायक! 

दिलीप गंभीरे
Sunday, 22 November 2020

कऴंब तालूक्यातील पालकात संभ्रम, मूलांना शाळेतच न पाठविण्याचा केला जातोय निर्णय. 

कळंब (उस्मानाबाद) : शासनाच्या निर्देशानुसार (ता.२३) रोजी शाळेची घंटा वाजणार आहे. त्यासाठी शाळा प्रशासनाला सर्व तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असून पाल्याना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे सहमतीपत्र आवश्यक असल्याने आपल्या पाल्याना शाळेत पाठवावे का कसे असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शासनाच्या निर्देशानुसार शाळेची घंटा वाजणार आहे. यासाठी प्रथमतः शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येऊन त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तालुक्यातील बहुतांश शिक्षक मुख्यालयी न रहाता तालुक्याच्या ठिकाणी राहून अपडाऊन करतात. शिक्षकाची एकवेळ कोरोना चाचणी झाली मात्र, अपडाऊनमुळे शिक्षक शाळेत कोरोना घेऊन आले तर धोका वाढणार नाही काय? असे प्रश्न पालकामधून उपस्थित केले जात आहेत. कोरोना संसर्गाचा धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यत आपले पाल्य शाळेत न पाठविण्याचा बहुतांश पालकांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शाळेत पाठवा पण सहमतीशिवाय नाही; विध्यार्थ्यांना शाळेत पाठवयाचे का नाही ही सर्वस्वी जबाबदारी पालकांवर ढकल्याण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार अवश्यकती तयारी केली आहे. विध्यार्थ्यांना शाळेत पाठवयाचे असल्यास किंवा शिक्षकांना विध्यार्थ्यांना प्रवेश देयचा झाल्यास पालकांचे सहमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत पाठवा पण सहमतीशिवाय नाही. बहुतांश शिक्षक मुख्यालयी न रहाता तालुक्याच्या ठिकाणी रहातात;

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कळंब तालुक्यातील खासगी तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत. शिक्षक मुख्यलयी रहात असल्याचा शासन तसेच प्रशासनाचा समज आहे.त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आहेत.अपडाऊनमुळे शिक्षकच कोरोना घेऊन शाळेत आले तर असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकल्याने आपले पाल्य शाळेत पाठविण्यास पालक सध्यातरी संभ्रमात आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher updown corona will dangerous growth