esakal | कोरोना टेस्टसाठी शिक्षकांची रांग पण विद्यार्थ्यांच्या टेस्टच काय
sakal

बोलून बातमी शोधा

kalanbh.jpg

शिक्षकांना कोरोना तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले असून, कोरोना सेंटरवर चाचणीसाठी कळंब तालुक्यात शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या चाचण्या झाल्या विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

कोरोना टेस्टसाठी शिक्षकांची रांग पण विद्यार्थ्यांच्या टेस्टच काय

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) :  २३ नोव्हेंबर पासून नववी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले असून, कोरोना सेंटरवर चाचणीसाठी कळंब तालुक्यात शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या चाचण्या झाल्या विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात नववी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी फक्त शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून उपस्थिती लावण्याचे आदेश आहेत. दिवाळी संपली आहे.त्यात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढू लागली आहे.त्यातच तब्बल सहा महिन्यानंतर शाळेला लावलेले कुलूप निघणार आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये किंवा काळजी घेण्याची जबाबदारी शासनाने नियमावली तयार करून शाळा व्यवस्थापनावर ढकलली आहे. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे फुस्कारे फुटले आहेत. शाळा सुरू करताना पालकांच्या हमीपत्रावर विध्यार्थी शाळेत येतील पण विध्यार्थी कोरोना बाधित आहेत की नाही याची खातरजमा कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी देखील प्रशासनाने शाळा व्यवस्थापवर ढकलली आहे. बहुतांश शाळेला शिपाई नाहीत. त्यामुळे निर्जंतुकीकरनाचे काम कोण करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय वर्गखोल्यांची नियमित तर सौचलयाचे दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करायचे आदेश आहेत. याची जबाबदारी कोण स्वीकारणार असा ही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शाळा कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांना शाळेत येता येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्टबाबत काय यांसदर्भात कुठल्याच सूचना देण्यात आल्या नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना चाचणीसाठी झुंबड 
स्थानिक शिक्षण प्रशासनाने शाळा केंद्रावर १०० शिक्षकांची कोरोना चाचणी होईल असे नियोजन करण्यात आले आहे.यासाठी केंद्रीय शाळेवर कोरोना टेस्ट करण्यासाठी शाळा कर्मचाऱ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एक बेंच वर एक विद्यार्थी 
बहुतांश शाळेत विध्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेषे बेंच उपलब्ध नाहीत.पण एक बेंचवर एक विद्यार्थ्यांना बसवून त्यांना अध्यापनाचे धडे देण्याचे आदेश आहेत. खासगी शाळेत विध्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याचे जाणवत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)