शिक्षकांनी उपसले बंदचे हत्यार 

download
download

हिंगोली ः राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेतर्फे विनाअनुदान कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान दिले नसल्याच्या कारणावरून सोमवारपासून (ता. २०) महाविद्यालय बंद ठेवून बारावी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन जिल्‍हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या बाबत प्रा. आशीष इंगळे, प्रा. जाधव, प्रा. ज्ञानेश्वर सिरसाठ, प्रा. आर. पी. बगाटे, जी. जे. वाबळे, प्रा. एस. डी. जाधव, प्रा. डी. डी. सिरसाठ, प्रा. ए. एम. इंगळे, प्रा. यू. एस. शेळके आदींनी निवेदन दिले आहे. 

मागील वर्षापासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक शिक्षक एकही रुपया पगार न घेता विनावेतन काम करीत आहेत. यापैकी बऱ्याच शिक्षकांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तरी राज्यातील कनिष्ठ महाविद्यायांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे काम शासन करीत आहे. 

या मागण्या महत्वाच्या 
येत्या अर्थसंकल्‍प अधिवेशनत १४६ अधिक १६३८ पात्र उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना २८ फेब्रुवारी २०१८-१९ व १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे व शंभर टक्‍के निकालाची अट रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असून सोमवारपासून जिल्‍ह्यातील संपूर्ण कॉलेज बेमुदत बंद ठेवण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

वसमत येथे आजपासून विनाअनुदानित कॉलेज बंद
वसमत ः तालुक्‍यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेतर्फे अनुदानाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २१) विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवणार असल्याचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडे दिले आहे. या बाबत प्रा. संदीप गुंडाळे, पा. गोविंद करवे, प्रा. सचिन कोल्‍हे, प्रा. बाळासाहेब डाखारे, प्रा. संदीप पातेकर, प्रा. नागेश नरवाडे, प्रा. आत्‍मराम राजेगोरे, प्रा. लक्ष्मीकांत कमळू आदींनी निवेदन दिले.

अनुदानासाठी बारावी परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय
माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. यामुळे शहरासह तालुक्‍यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. अनुदानाअभावी त्‍यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदानाच्या पूर्ततेसाठी बारावी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून शहरासह तालुक्‍यातील संपूर्ण विनाअनुदानित महाविद्यालये बंद ठेवण्याचे निवेदनात नमूद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com