अरे बाप रे! अनर्थ टळला, ते दाटीवाटीत बसून निघाले गावाकडे, अन्...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

हे प्रवासी त्यांच्या गावात गेले असते तर त्यांच्या संपर्कात आणखी काही जण आले असते. त्यामुळे संसर्ग वाढला असता. 

वडीगोद्री (जि. जालना) ः डोणगाव (ता. अंबड) येथील चेकपोस्टवर सात जणांना अडविण्यात आले होते. ‘कोविड-१९’च्या संशयावरून त्यांची चाचणी केली असता ते बाधित आढळले, अशी माहिती वडीगोद्री येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी दिली. हे प्रवासी त्यांच्या गावात गेले असते तर त्यांच्या संपर्कात आणखी काही जण आले असते. त्यामुळे संसर्ग वाढला असता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

ता. ११ मे रोजी एका वाहनात बसून ३७ लोक हे ठाणे येथून पीरगॅबवाडी (ता. घनसावंगी) येथे चालले होते. डोणगाव चेकपोस्ट येथे त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे यांच्या मार्गदर्शनात वडीगोद्रीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जावळे व त्यांच्या पथकाने तपासणी केली असता काही कोविड संशयित आढळले होते. त्यांना पोलिस बंदोबस्तात घनसांवगी येथे दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जालना येथे संदर्भित करण्यात आले. सात जणांचा अहवाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आला. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
 
कोरोनाने पार केली तिशी  
जालना ः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी (ता.१७) रात्री दहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५ झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची चिंता वाढली असून, नागरिकांना प्रशासनाने लेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळत आहे. मात्र, वाढती रुग्ण संख्या सर्वांच्या चिंतेत भर पाडत आहे. रविवारी रात्री दहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. रुग्णालयातील बाधितांची संख्या आता २८ झाली आहे. नव्याने बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सात रुग्ण घनसावंगी तालुक्यातील असून, ते मुंबईहून परतले होते. प्रशासनातर्फे त्यांचे संस्‍थात्मक अलगीकरणात करण्यात आले होते. यातील सहा जण पिरगेबवाडी येथील तर एक व्यक्ती रांजणी येथील आहे. 

 असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

उर्वरित तिघांमध्ये दोन जण हे शहरातील एका खासगी हॉस्पि‍टलधमील कर्मचारी आहे. एक रुग्ण कानडगाव (ता. अंबड) येथील ५८ वर्षीय पुरूष असून, त्याचा पहिला अहवाल कोरोना निगेटीव्ह आला होता. सदर व्यक्ती आपल्या मुलासोबत ता. १० मे रोजी मुंबईहून जिल्ह्यात आता होता. त्यांचा मुलगा आणि बायको यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड हॉस्पि‍टलमध्ये २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 
जिल्हाभरात ५४४ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरणात 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी ४५६ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.यात जालना शहरातील संत रामदास हॉस्‍टेलमध्ये ३४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्‍टेलमध्ये २९, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ६, मोतिबा येथील वसतिगृहात १७ व पोलिस प्रशिक्षण केंद्रात १०६ व्यक्ती अलगीकरणात आहेत.

जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात पाच, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ३४ तर राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे १०१ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २४ तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १४ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. घनसावंगीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४१ तर अल्पसंख्यांक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ४५ व्यक्तीचे अलगीकरण केले आहे. भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात ६० तर मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये २८ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
  
कोरोना मीटर 

  • एकूण बाधित - ३५ 
  • बरे झालेले - ७ 
  • उपचार सुरू असलेले - २८ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten more Covid-19 patients in Jalna