esakal | उद्यापासून दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

pariksha.jpg
  • - परीक्षार्थींनी अर्धातास उपस्थिती आवश्‍यक. 
  • - थर्मल गणद्वारे तपासणीनंतर प्रवेश.
  • - हॅण्डवॉश, सॅनिटायझरची सुविधा.
  • - केंद्रावर आरोग्य पथकाचीही हजेरी.

उद्यापासून दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला शुक्रवारपासून (ता.२०)सुरुवात होत आहे. कोरोना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा ते एक तास लवकर उपस्थिती राहावे लागणार आहे. तसेच थर्मल गणद्वारे तपासणी करुन विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिले जाणार आहे. बोर्डाकडून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, मागील दोन वर्षापासून जुलै, ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहेत. पंरतू, यंदा मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे परीक्षा उशीरा होत आहे. परीक्षा केंद्रावर दक्षता घेण्यासंदर्भात सर्व शाळा-महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. सकाळी १०:३० ते १:३० यावेळेत पेपर होणार असून, केंद्रात येतांना मास्क बंधनकारक आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार असून, एका हॉलमध्ये १२ किंवा १३ परीक्षार्थी बसवण्यात येणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी दोन भरारी पथक असणार आहे. विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीकोणातून प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक देखील उपस्थिती राहाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातून ६ हजार ६२३ ; तर बारावीचे ६ हजार ७७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

२० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद व हिंगोली या पाच जिल्ह्यातून दहावीसाठी ४४ केंद्रावर ६ हजार ६२३; तर बारावीच्या परीक्षेला ३९ केंद्रावर ६ हजार ७७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १५ परीक्षा केंद्रावर दहावीचे २ हजार ४०२; तर बारावीचे २ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)