esakal | ब्रेकिंग : जालन्यात गर्भवतीसह तीन कोरोना पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

आठवडाभरानंतर जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता एकुण बाधीतांची संख्या अकरा झाली आहे. नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील दोन रूग्णांचा समावेश असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका गर्भवतीचा समावेश असल्याची माहिती रविवारी (ता. दहा) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठाडे यांनी दिली आहे.

ब्रेकिंग : जालन्यात गर्भवतीसह तीन कोरोना पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना : आठवडाभरानंतर जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता एकुण बाधीतांची संख्या अकरा झाली आहे. नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील दोन रूग्णांचा समावेश असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका गर्भवतीचा समावेश असल्याची माहिती रविवारी (ता. दहा) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठाडे यांनी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात ता.१ मे पर्यंत आठ रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन महिला रूग्णांचा उपचारानंतरचा अहवाल कोरोना निगेटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे एका महिलेला सुट्टी देण्यात आली आहे. तर इतर सहा रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी पुन्हा तीन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यातील दोन रूग्ण हे मुंबईवरून अंबड तालुक्यातील कानडगाव येथे आले होते. तर गर्भवती महिला जालना तालुक्यातील जामवाडी येथील असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे.

पारध येथील त्या युवतीचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह
गुजरातधून आपल्या कुटुंबियासोबत पारध (ता.भोकरदन) मध्ये आलेली  एक सतरा  वर्षीय युवती कोरोना बाधीत आढळून आली आहे. उपचारानंतर पाठविण्यात आलेल्या तिच्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवालही पॉसीटीव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठाडे यांनी दिली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा